आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Railway Growth Rate,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेच का ‘अच्छे दिन’, रेल्वे दरवाढीचा फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दरवाढीमुळे अमरावतीकरांना जबर धक्का बसला, त्या वेळी प्रसारमाध्यमांवर रेल्वे भाडेवाढ झाल्याची बातमी झळकू लागली. सर्वच प्रवाशांच्या भुवया या बातमीने उंचावल्या. जो तो विचारू लागला 14.2 टक्के म्हणजे नेमके किती रुपयांनी तिकीट महागणार? अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकांवरही आज हाच चर्चेचा विषय होता. सामान्य प्रवासीच नव्हे, तर रेल्वेचे अधिकारीदेखील वृत्तवाहिन्यांवरील बातम्या कान देऊन ऐकत होते. ज्या ठिकाणी टीव्ही उपलब्ध नव्हता, त्या सर्व स्थानकांवर प्रवासी तथा रेल्वे अधिकारी, कर्मचारी वॉट्स अँप, न्यूज हंट आणि न्यूज पोर्टल वेब साइटवर भाडेवाढीचा आढावा घेत होते. क्वचितप्रसंगी अकोल्याहून मूर्तिजापूर, अकोल्याला जाणार्‍यांना ही भाडेवाढ अवघी सात रुपये 81 पैशांची वाटत असली, तरी लांबचा प्रवास करणार्‍यांना ही दरवाढ चांगलीच चटका लावणारी ठरणार आहे.
‘जिवाची मुंबई’ही महागली
अमरावतीकरांची जीव की प्राण असलेल्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचे दरही वधारणार आहेत. सोबतच पुणे, तिरुपतीचे दरही सामान्यांच्या खिशाला जड असेच होणार आहे. त्यामुळे यापुढे जिवाची मुंबईही सामान्यांना परवडण्यासारखी राहणार नाही.
नाराज करणारी बातमी
मोदी सरकार आल्यानंतर महागाईवर नियंत्रण येईल असे वाटत होते, पण रेल्वे दरवाढीची बातमी नाराज करणारी आहे. तुषार नाकाडे, प्रवासी
श्रणी बदलाचा हा परिणाम
रेल्वेची केवळ भाडेवाढच झालेली नाही, तर र्शेणीतही बदल झाला आहे. रेल्वेला तोट्यात ठेवून अर्थसंकल्प तयार करण्याचा सर्वच सरकारांनी आतापर्यंत घाट घातला. मात्र, मोदी सरकारने काहीतरी चांगले देण्याचा प्रयत्न केला आहे. आनंदराव अडसूळ, खासदार