आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने घेतला आहे 14 जणांचा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विभागातील १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे, तर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील १५० घरांचे छप्पर उडून गेल्याने या परिवारांच्या निवाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विभागात ५२ जनावरांचा या पावसाने बळी घेतला आहे. यात नदीच्या पुरात वाहून गेल्याने, वीज कोसळल्याने आणि दरड कोसळल्याने मृत्यू ओढवल्याचे प्रकरणे आहेत, असे विभागीय पुनर्वसन विभागाच्या अहवालात म्हटले आहे. यात अमरावती- ४, अकोला- १, यवतमाळ- ३, बुलडाणा- आणि वाशीममध्ये असे एकूण १४ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात जणांचा मृत्यू वीज कोसळल्याने, चार जण पुरात वाहून गेल्याने, तर एकाचा दरड कोसळून मृत्यू झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवारांना नियमाप्रमाणे मदत देण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपत्तीचा सामना करण्यासाठी विभागस्तरावर विभागीय नियंत्रण कक्ष तसेच जिल्हा, तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे.

या नियंत्रण कक्षात मदतकार्य करणाऱ्या संबंधितांचे संपर्क क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयात लावले आहेत. पूरग्रस्त गावातील कुटुंबाचे स्थलांतरण करून त्यांना राहण्याची व्यवस्था करण्याबाबत सूचना विभागीय प्रशासनामार्फत दिल्या आहेत. त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी अन्नपुरवठा याबाबतही काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती नैसर्गिक आपत्ती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...