आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसर्‍यापर्यंत कायम राहणार पावसाचा जोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा संथ गतीने पुढे सरकत आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने धरलेला जोर जिल्ह्यात दसर्‍यापर्यंत कायम राहणार आहे. शुक्रवारी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती.

दुपारी दोनपासून शहरात पाऊस सुरू झाला. 24 तासांत 12.3 मिलिमीटर पावसाची नोंद शहरात झाली आहे. एकूण पावसाची नोंद सुमारे 19.8 मिलिमीटर आहे. उपसागरातील कमी दाबाचा पट्टा विदर्भावर स्थिरावल्याने दसर्‍यापर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अमरावती, बडनेरासह भातकुली, अंजनगावसुर्जी, चिखलदरा, धारणी या तालुक्यांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.