अमरावती - जिल्ह्यातील काही तालुक्यांत सोमवारी (दि. ४) सायंकाळच्या सुमारास गारपीट पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे हाताशी आलेल्या कांद्याचे नुकसान झाले. संत्रा, भाजीपाला, कुटारालाही पावसाचा फटका बसला. चांदुर रेल्वे तालुक्यातील काही भागांत बोराच्या आकाराची गारपीट झाली. धामणगाव रेल्वे, वरुड, ितवसा तालुक्यांतील काही भागांत हलक्या सरी कोसळल्या.
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी पिकांचे जबर नुकसान झाल्यानंतर अखरेच्या टप्प्यातील कांदा, भाजीपाल्याला गारपिटीचा तडाखा बसला. चांदुर रेल्वे तालुक्यात रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास विजांच्या गडगटासह पाऊस पंधरा मिनिटे गारपीट झाली. शहरात अनेक ठिकाणी जुने वृक्ष कोसळले. यामुळे एक दुचाकी एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. वादळामुळे विजेचे खांब वाकले. तारा तुटल्याने वीजप्रवाह खंडित झाला. वरुड, धामणगाव रेल्वे, तिवसा तालुक्यांत काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. मोर्शी तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे. गारपीट पावसामुळे कांदा, संत्र्याच्या आंबिया बहाराचे नुकसान झाले.
गारपिटीचीही शक्यता
मंगळवार(दि. ५) शुक्रवारीही (दि. ८) जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने भुईमूग, कांदा, संत्रा, केळी, सूर्यफूल यांसह भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.