आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे पिकं भुईसपाट, मदतीची वाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील पाच वर्षांत निसर्गाच्या लहरीपणाचा तडाखा बसलेल्या तब्बल दाेन लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांची मदत अद्यापही थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील पाच वर्षात विविध कारणाने निसर्गाच्या दृष्टचक्राने शेती फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाचा मार सहाव्या वर्षी देखील सहन करण्याची वेळ वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांवर आली आहे.
सोन्याची कुऱ्हाड असे म्हटले जाणाऱ्या वऱ्हाडाला निसर्गाच्या अवकृपेची नजर लागली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेती मालाला हमी भाव नाही, पिकवले त्यात समाधानकारक उत्पन्न नाही. उत्पादनापेक्षा लागवडीचा खर्च जास्त असल्याने मागील पंधरा ते वीस वर्षात कोरडवाहू शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्या गेले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होत नाही तोच मर रोग, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पूर,जमीन खरडून जाणे, अतिथंडी एवढेच नव्हे तर पाणी टंचाईने देखील शेतकऱ्यांची पिके नष्ट झाल्याची पाच वर्षातील उदाहरणे आहेत.

नैसर्गिक दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची शासनाने देखील थट्टाच केली असल्याचे चित्र आहे. थातूर-मातूर मदत केल्याचा देखावा तत्कालीन शासन प्रशासनाकडून करण्यात आला. असे असले तरी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मागील पाच वर्षांचे वास्तव प्रशासनाकडून मांडण्यात आले. जिल्ह्यात झालेले हेक्टरी नुकसान तसेच त्यांच्या कारणांची मिमांसा करण्यात आली. शेती फळ पिकाचे क्षेत्र लाख २६ हजार ३७३.४३ हेक्टर एवढे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.