आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच दिवशी अमरावतीकरांनी अनुभवले ‘नक्षत्राचे देणे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नक्षत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ‘रोहिणी’ बरसल्याने अमरावतीकरांसह जिल्हावासीयांना रविवारी खर्‍या अर्थाने ‘नक्षत्राचे देणे’ अनुभवता आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आकाशात अचानक मेघ दाटून आले. पाठोपाठ पावसाची हलकी सरही आली. सहाच्या सुमारास आकाशात वीज कडाडण्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. रविवार असल्याने अनेकांचा शॉपिंगचा बेत फिस्कटला. लग्न-समारंभाला जाणार्‍यांनाही पावसाचा सामना करावा लागला. पावसामुळे व्यावसायिकांनाही फटका बसला. ग्राहकच फिरकले नसल्याने त्यांना अपेक्षित लक्ष्य गाठता आले नाही. सरी कोसळल्याने चार-पाच दिवसांपासून वाढलेली उन्हाची दाहकता कमी झाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहर्‍यावर दिसला.
आद्र्रता नकोशी झालीय
पावसाचे दोन तास संपल्यानंतर आद्र्रतेची तीव्रता वाढली. ज्यांच्याकडे एअर कंडिशनिंग आहे, त्यांना वातावरणाशी जुळवून घेता आले, तर इतरांना चिकचिक सहन करावी लागली.
विंचू-सापांपासून करा बचाव..
पावसाळा सुरू झाला, की साप, विंचू अशा सरपटणार्‍या कृमी, कीटक व प्राण्यांचा आढळही वाढतो. बेडकाच्या शोधात ड्रेनेजचे काठ किंवा बाथरूमच्या दिशेने पानबिवळ नावाचा साप आढळतो, तर भिंतीवरील पाल हे खाद्य असणारा कवड्या थेट भिंतीवरही दिसून येतो. त्यापासून बचावासाठी काही सर्पमित्र पुढे आले आहेत.

नीलेश कंचनपुरे, दस्तुरनगर, 9766169174
तुषार पुंडकर , महादेवखोरी, 9503548296
गुणवंत पाटील, दस्तुरनगर, 9665444655
कुंवरचंद श्रीवास, एमआयडीसी 9420920867
राघवेंद्र नांदे, सहकारनगर, 9860828331