आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ढगाळ वातावरण, बरसणार तुरळक पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अरबीसमुद्रामध्ये लक्षद्वीपापासून उत्तर गुजरातपर्यंत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रवविारी विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान ख्यात्याने वर्तवली आहे.
शनिवारी पहाटे शहर परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली, तरजिल्ह्यामध्ये सायंकाळी परतवाडा, चिखलदऱ्यात डबकी साचण्याजोगा पाऊस झाला. आगामी दोनदविस ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अमरावतीकरांना स्वच्छ ऊन अनुभवता येणार नाही.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये झालेला अवकाळी पाऊस गारपटिीचा बागायतदारांना फटका बसल्यामुळेजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोटात गोळा उठला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे विदर्भात सोमवारनंतर थंडीचा जोर वाढू शकतो, असा अंदाज श्री 'शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. थंडीजिल्ह्यातील रब्बी पिकांसाठी लाभदायक ठरते. मात्र, दोन दविसांच्या ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. रात्रीची थंडी आणि दविसाच्या ढगाळ वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. सर्दी, डोकेदुखी, घसा खवखवणे, ताप अशा तक्रारी वाढल्या आहेत.
लहान मुलांना बालदम्याचा त्रास
ढगाळवातावरण आणि थंडी वाढल्यास चिमुकल्यांना श्वास घेण्यात त्रास होतो. बालदम्याची लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून येतात. एक ते १० वर्षे वयोगटात सर्दी, खोकला, नाक बंद होणे, या तक्रारी आढळतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दविसांपासून दररोज या तक्रारींचे रुग्ण दाखल होत आहेत, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश नागलकर यांनी सांगितले.
सोमवारनंतर थंडीत वाढ
-गुजरातते लक्षद्वीप आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण आहे. रविवारी सुद्धा हे वातावरण कायम राहणार असून पावसाची शक्यता आहे. सोमवारनंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. डॉ.अनिल बंड, हवामानविभाग तज्ज्ञ