आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीडी पाहण्यास मीही उत्सुक, वळण देऊ नका - रावसाहेब शेखावत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पोलिस आयुक्त अजित पाटलांनी खोटेनाटे आरोप करण्यापेक्षा नैतिक जबाबदारी स्वीकारावी. गजेंद्र उमरकर सीडी प्रकरणात काहीही तथ्य नाही. तशी सीडी असल्यास आपणास दाखवावी. बघण्यास मीही उत्सुक आहे. प्रकरणास वळण देऊन वेळ मारून नेण्याचा हा प्रकार आहे, असे रोखठोक मत रावसाहेब यांनी मांडले.

शहरात सध्या पोलिस प्रशासन विरुद्ध रावसाहेब शेखावत असा संघर्ष पेटला आहे. शेखावत यांना झालेली मारहाण, त्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुकारलेला ‘अमरावती बंद’, पोलिस आयुक्त अजित पाटलांना हटवण्याची काँग्रेस आमदारांची मागणी, धोत्रेंच्या स्थानांतरावर नाखुशी दर्शवणारे रावसाहेब शेखावत असा पट रंगला असतानाच डोनेशन संदर्भातील गजेंद्रच्या स्टिंग ऑपरेशनच्या कथित सीडीची पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. मारहाण करणारा गजेंद्र न्यायालयीन कोठडीत असल्याने या सीडीचा अद्यापही ठावठिकाणा नाही. तरीही सीडीप्रकरणी चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. गजेंद्रनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनची सीडी तात्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सोपविली असल्याचे अजित पाटील यांनी सांगितले होते. या संदर्भात पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे गजेंद्रची सीडी पोलिसांना मिळाली वा नाही, हे कळू शकले नाही.

नैतिक जबाबदारी स्वीकारावी
पोलिस आयुक्तांना सध्या काही सूचत नाही.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गजेंद्र हा मनोरुग्ण आहे, तर मग त्याने सांगितलेले सीडी प्रकरण कसे सत्य आहे? सीडी प्रकरणी कोणतेही तथ्य नाही. अशी सीडी असेल तर त्यांनी दाखवावी. मी पण बघायला उत्सुक आहे. असे खोटेनाटे आरोप करण्यापेक्षा मला झालेल्या मारहाणीची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. रावसाहेब शेखावत, काँग्रेस आमदार

त्या सीडीमध्ये दडलंय काय?
आमदार शेखावत यांच्या विद्याभारती महाविद्यालयात प्रवेशासाठी कसे डोनेशन घेण्यात येते, याचे स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा गजेंद्रने केल्यामुळे तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस आयुक्त अजित पाटील यांचे म्हणणे आहे.