आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raosaheb Shekhawat News In Marathi, Congress, Nationalist Congress

निष्कासितांना हात; काँग्रेस सोडेल साथ,रावसाहेबा शेखावतांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पक्षातून निष्कासित करण्यात आलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेस जवळ करत असेल, तर काँग्रेस निवडणुकीतून अंग काढून घेईल, असा सूचक इशारा आमदार रावसाहेब शेखावत यांनी बुधवारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला. नवनीत राणा यांच्या उमेदवारीनंतर आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली सुंदोपसुंदी काँग्रेसमध्येही सुरू झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.


नवनीत राणा यांनी नामांकन दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे अमरावती लोकसभेचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी काँग्रेसमधून निलंबित माजी मंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वतरुळात होती. त्यामुळे शहर काँग्रेस निवडणुकीपासून दूरच होती. राष्ट्रवादीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी आमदार रावसाहेब शेखावत यांची भेट घेतल्यानंतर हा वादाचा मुद्दा पुढे आला होता. राणा यांची उमेदवारी दाखल झाल्यानंतर बुधवारी रात्री चौबळ वाडा येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मनपामध्ये काँग्रेसचे 30 नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आल्याचे त्यांनी नमूद केले.


अडसुळांचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न
प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतिपदी असताना अमरावतीला भरभरून मिळाले. रावसाहेबांनीही दिल्ली दरबारी प्रयत्न केले. त्यामुळे नरखेड रेल्वे, फिनले मिल, मॉडेल रेल्वे स्थानक, रेल्वे कोच दुरुस्ती कारखाना, असे अनेक प्रकल्प शहरात आले. रावसाहेबांनी केलेल्या कामाचे श्रेय आनंदराव अडसूळ घेत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.