आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातीलनामांकित संस्थेच्या वसतिगृहामधील १४ वर्षीय मुलीवर त्याच परिसरातील एकाने पंधरादिवसांअगोदर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने गुरुवारी उशिरा रात्री गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ‘ती २६ नोव्हेंबरला कामानिमित्त वसतिगृहाच्या मागील बाजूला असलेल्या सागवानच्या जंगलामध्ये गेली होती. तेव्हा एकजण त्या ठिकाणी आला. त्याने मुलीचे छायाचित्र काढले.
त्याचा आधार घेऊन त्याने अल्पवयीन मुलीवर जबरीने अत्याचार केला’. पीडितेच्या तक्रारीवरून अत्याचार करणाऱ्याविरुद्ध बलात्कार, अॅट्राॅसिटी, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली.
पोलिसांचा गोपनीयरीत्यातपास :
शहरपोलिस प्रकरणाचा गोपनीयतेने तपास करत आहेत. त्यामुळे माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. आरोपीला १७डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.