आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशनचे धान्य आता बोटांच्या ठशांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- स्वस्तधान्य दुकानांमधून (कंट्रोल) मिळणारे धान्य यापुढे शिधा पत्रिका बघून नव्हे तर कुटुंबातील सदस्यांच्या बोटांचे ठसे उमटविल्यानंतर मिळणार आहे. यासाठी आवश्यक असलेली बायोमेट्रिक यंत्रणा प्रत्येक रेशन दुुकानात स्थापन केली जात असून त्यासाठीचे अर्ज भरुन घेण्याच्या कालावधीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
पूर्वी या अर्जांच्या स्वीकृतीसाठी ३० एप्रिल ही अखेरची तारीख ठरविण्यात आली होती. परंतु बहुतेक भागातील अर्ज भरायचे असल्याने तिला १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र तरीही संपूर्ण अर्ज प्राप्त झाल्याने अाता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. रेशनचा काळाबाजार थांबविण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणून या नव्या पद्धतीकडे पाहिले जाते. कोकण पश्चिम महाराष्ट्रातील निवडक निल्ह्यात ही पद्धत लागू करण्यात आली असून हळूहळू तिचा व्याप राज्यभर पोहचवला जाणार आहे.

त्यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारामार्फत ग्राहकांकडून अर्ज भरुन घेतले जात असून हा एकत्रीत डाटा लवकरच अन्न धान्य वितरण विभागाकडे सादर केला जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांची एकूण संख्या, त्यांची ओळखपत्रे, आधार कार्डस्, निवडणूक आयोगाचे कार्डस्, कुटुंबातील कर्त्या महिलेच्या नावे असलेल्या बँक खात्याची सत्यप्रत रेशन कार्डची सत्यप्रत असा हा डाटा आहे.
हा संपूर्ण डाटा संगणकीकृत केला जाणार असून त्याआधारे शिधापत्रिकेचे स्वरुपही स्मार्ट कार्डसारखे होणार आहे. एकदा हे डाटाफिडिंग आटोपले की शिधापत्रिकेतील सदस्यांच्या बोटांचे ठसे आधार कार्डच्यावेळी घेतलेल्या डोळ्यांच्या नोंदी रजिस्टर्ड केल्या जातील. पुढे धान्य वितरण करताना आज जसे रेशन कार्ड मागितले जाते, त्याऐवजी या नोंदी पटवूनच संबंधितांना रेशन दिले जाईल, अशी शासनाची योजना आहे.

नव्या आदेशापर्यंत अर्ज स्वीकारणार

रेशनकार्डबायोमेट्रीक करण्यासाठी नवा आदेश येईपर्यंत अर्ज भरुन घेतले जातील, असे अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आले. काही तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका तर काही ठिकाणी सहकार क्षेत्रातील निवडणुका असल्यामुळे मध्यंतरीच्या काळात अर्ज भरुन घेता आले नाहीत. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आल्याचे म्हणणे आहे.

पुढे काय होणार ?
जिल्ह्यातसुमारे तीन लाखांवर रेशन कार्ड आहेत. अंत्योदय, बीपीएल, एपीएल, एपीएलमधील प्राधान्य गट, शुभ्र कार्ड अशी या रेशनकार्डांची विभागणी आहे. या सर्वांच्या बायोमेट्रीक नोंदी घेण्याचे काम सुरु आहे. लवकरच ते पूर्णत्वास नेऊन भविष्यात धान्याची देवाण-घेवाण बोटांच्या ठशांच्या आधारे सुरु केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...