आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मिटणार रेशनचे टेन्शन , १०९ नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या (पीडीएस) बळकटीकरणासाठी जिल्‍हातील अकरा तालुक्यांमध्ये आणखी १०९ नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू केली जात आहेत. जिल्‍हा प्रशासनाने त्यासाठीची अधिसूचना जारी केली असून, २० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागवले आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे तिवसा, चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन तालुक्यांना वगळण्यात आले असून, येथे निवडणुकीनंतर रेशन दुकानांची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रथमच एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन रेशन दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.
अन्न-धान्य वितरण व्यवस्थेत झालेला बदल, फेब्रुवारी २०१४ मध्ये लागू झालेला अन्न सुरक्षा कायदा, उन्नत (एपीएल) उत्पन्न गटातील बहुतेक नागरिकांसाठी लागू केलेली प्राधान्य गटाची योजना आदींमुळे अन्न-धान्याचे वितरण वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत नवीन दुकानांची गरज चौनिर्मा ण झाली होती.

या गरजेपोटी भातकुली तालुक्यात सर्वाधिक २४ नवी दुकाने उघडली जाणार असून, अचलपूर अमरावती तालुक्यांत अनुक्रमे २२ २० दुकाने सुरू केली जाणार आहेत. याशिवाय चिखलदरा तालुक्यात ११, वरुडमध्ये १०, चांदूरबाजार आठ, मोर्शीत पाच, दर्यापुरात चार, धारणी नांदगाव खंडेश्वरमध्ये प्रत्येकी दोन तर अंजनगाव सुर्जी तालुक्यात एक दुकान उघडले जाईल, असे यंत्रणेचे म्हणणे आहे.

यंत्रणा निर्दोष करू
अन्नधान्य वितरणासाठीची यंत्रणा अधिक लोकािभमुख निर्दोष करण्याचा प्रयत्न आहे. वितरणात कोणताही घोळ होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. ग्रामीण भागातील दक्षता समित्यांनी सतर्क राहिल्यास तक्रारींची संख्या कमी होईल. माधविचमाजी, उपायुक्त,अमरावती.