आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्जप्रकरणी शेतकऱ्यांना दिलासा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे शक्य नसले, तरी विभागातील पाचही जिल्ह्यातील दहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या पुनर्गठनाने दिलासा मिळणार आहे. पुढील तीन वर्षांकरिता पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. या पीक कर्जाच्या पुनर्गठनाचा लाभ मिळण्याचा शेतकऱ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोकण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली होती.
विधानसभेतही विरोधकांनी ही मागणी रेटली होती. मात्र, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मंगळवारी विधानसभेत सांगितले. तर या ऐवजी दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुढील तीन वर्षांकरीता पुनर्गठन करण्यात येणार आहे. यात अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यांतील ११ लाख ४५ हजार १८९ कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी चा कालावधी वाढवून मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांतील ७,२४१ गावांमधील आणेवारी पन्नास पैशांच्या आत आल्याने ही गावे दुष्काळग्रस्त घोषित केली आहेत. यामुळे अमरावती विभागातील १९ लाख ९४ हजार ६७२ शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त सवलती जाहीर केल्या होत्या, तर विभागातील पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे ३,७३६ कोटींचे कर्ज थकीत आहे. दुष्काळी परिस्थिती आणि त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट आली.