आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंग्याचा मान राखण्यासाठी सरसावल्या शहरातील शाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ‘दिव्य मराठी’तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘राष्ट्रध्वज सन्मान’ अभियानाला शहरातील शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तिरंग्याचा मान राखण्यासाठी शहरातील शाळांनी पुढाकार घेतला असून, शुक्रवारी (दि. 24) या शाळा विद्यार्थ्यांना तिरंग्याचा सन्मान राखण्याची शपथ देणार आहेत.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक आणि कागदाच्या राष्ट्रध्वजाची विक्री होते. यानंतर मात्र राष्ट्राच्या सन्मानाचे प्रतीक असणारा आणि देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या तिरंग्याकडे दुर्लक्ष केले जाते. हा अपमान टाळण्यासाठी आणि राष्ट्रध्वज जमिनीवर पडू नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाचे मुख्य केंद्र असलेल्या शाळांनी आता राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.