आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळा, आरक्षणाच्या मुद्दय़ावरून आमने-सामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- गल्र्स हायस्कूल चौकात बसवला जाणारा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व आरक्षणासाठी आदिवासी आणि धनगर समजबांधवांनी सुरू केलेला लढा, या दोन मुद्दय़ांवरून जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, दोन्ही पक्षांतर्फे घेण्यात आलेल्या सामंजस्याच्या भूमिकने अखेर तणाव निवळला.
धनगर समाजातील नागरिक आदिवासींमध्ये मोडतात, असे केंद्र शासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण देताना ते आदिवासींच्या आरक्षणातूनच दिले जावे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे, तर दुसरीकडे हे गैर असून तो आमच्या आरक्षणावर घाला आहे, असे आदिवासींचे म्हणणे आहे. अन्य एका मुद्दय़ानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यासाठी प्रशासनातर्फे गल्र्स हायस्कूल चौकाची जागा निश्चित करण्यात आली आहे, तर याच जागेवर आदिवासींनी राणी दुर्गावती यांचा पुतळा बसवण्याचा दावा केला आहे. त्यामुळे स्वाभाविकच जिल्हाधिकारी कार्यालयात जेव्हा दोन्ही प्रतिनिधी मंडळ समोरासमोर आली, तेव्हा तणाव निर्माण झाला होता. मात्र, दोन्ही प्रतिनिधी मंडळांतील ज्येष्ठांनी अत्यंत संयम राखत हा तणाव दूर केला. तत्पूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे देण्यात आली, तर आदिवासी समाजाच्या नागरिकांनी राजकमल चौकात निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
अशी झाली तणातणी
प्रारंभी महापौर वंदना कंगाले यांच्या नेतृत्वातील आदिवासींचे प्रतिनिधी मंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना सभागृहात बसायची विनंती केली. तेवढय़ात धनगरांच्या प्रतिनिधी मंडळाचाही प्रवेश झाला. त्यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात शिरण्याचा प्रयत्न केला. उपस्थित सुरक्षारक्षक व पोलिसांनी त्यांना तसे करू दिले नाही. त्यामुळे त्यांनाही सभागृहात बसण्याची सूचना देण्यात आली. दरम्यान, धनगर समाजचे नेते अँड. दिलीप एडतकर यांनी महापौरांशी संवाद साधत आपला आपसांत संघर्ष नाही. आपण दोघेही शासनाविरुद्ध लढत आहोत, हे स्पष्ट केले.