आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revenue Golden Jubilee Campaign, Farmers 'general Satisfaction'

सुवर्णजयंती राजस्व अभियान, शेतकर्‍यांना ‘महासमाधान’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-महसूल विभागाच्या समाधान योजना महामेळाव्यामध्ये शुक्रवारी (दि. 17) अनेक लाभार्थींना विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले. अपर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकर्‍यांना ट्रॅक्टरसाठी, तर बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्जाचे धनादेश देण्यात आले.

शेतकरी व इतर घटकांची कामे सहजतेने करण्यासाठी राज्य शासनाने सुवर्णजयंती राजस्व अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात सध्या संगणकीकरणाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक दाखले त्वरेने उपलब्ध करून दिले जात आहेत. त्या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून अमरावती, तिवसा, भातकुली या तीन तालुक्यांसाठी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात महासमाधान कार्यक्रम घेण्यात आला.

काहीशा अशाच पांडेबुवांचे वर्णन केल्यानंतर जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आता ते इन्लँड टू ऑन लँड (जमिनीवर) होईल. त्यांना लॅपटॉपने सज्ज केले जात असून, यापुढे ते दिवसाचे 24 तास काम करू शकणार असल्याचेही सांगितले.

काय आहे महासमाधान
महासमाधान योजनेत मुख्यत्वे भूसंपादन व फेरफारच्या नोंदी संगणकीकृत केल्या जाणार आहेत. पांदण रस्ते खुले करणे, शेतकरी व सामान्य नागरिकांना लागणारी प्रमाणपत्रे त्वरेने अदा करणे यावर भर दिला जाईल. शासनाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून त्याची मुहूर्तमेढ रोवली. थोडक्यात, इ-चावडी अशी ओळख आहे.

आता ‘इन्लँड’ला पर्याय ‘ऑन लँड’

अमरावतीत पाहिजे दोन तहसील कार्यालये

‘स्लीप ऑफ टंग’
आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकार्‍यांचे गुणगान करीत, असतानाच त्यांच्या नावाचा उल्लेख ‘राहुल महिवाल’ऐवजी ‘चंद्रकांत महिवाल’ असा केला. क्षिप्रा मानकर यांनीही उच्च् सनदी अधिकारी स्वाधीन क्षत्रिय यांच्या पदाचा उल्लेख ‘अपर मुख्य सचिवां’ऐवजी थेट ‘मुख्य सचिव’ असा केला. पुढे चूक सुधारत अंबादेवी, बहिरमबुवांच्या आशीर्वादाने आपल्याला ते पद मिळेल, अशा शुभेच्छाही अमरावतीवासीयांतर्फे देऊन टाकल्या.

स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते शंकर थूल यांनी धनादेश स्वीकारला.

आमदार अँड. यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणातून अमरावतीत दोन तहसील कार्यालये द्यावीत, अशी मागणी केली. अमरावती शहर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कार्यालये असावीत, अशी त्यांची मागणी आहे. त्याचवेळी भातकुलीला तिवसापासून वेगळे करीत उपविभागीय कार्यालयाचे (एसडीओ) स्वतंत्र कार्यालय द्यावे, असा आग्रहही त्यांनी धरला आहे. अपर मुख्य सचिव क्षत्रिय यांनी या मागणीला हो देत, तसे करणार असल्याचे स्पष्ट केले.