आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये वाहतूक नियमांकडे सर्रास डोळेझाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-वाहतूक नियमांची पायमल्ली करीत काही ऑटोरिक्षाचालकांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिस तैनात असले तरी त्यांच्यासमोरून ऑटोरिक्षाचालक समोरच्या सीटवर प्रवासी बसवून धोकादायक वाहतूक करीत आहेत. राजापेठ ते दस्तुरनगर, बडनेरा ते राजापेठ, श्याम चौक ते गाडगेनगर चौक, वलगाव ते पंचवटी चौक, इर्विन चौक ते विद्यापीठ या मार्गांवरून ही वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. चालकाच्या सीटवर प्रवासी बसवण्याचे सर्वाधिक प्रकार इतवारा परिसरात दृष्टीस पडतात. इर्विन चौक, मालवीय चौक, चित्रा चौक मार्गे होणार्‍या वाहतुकीत मोटार वाहन कायद्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.

याबाबत ऑटोरिक्षाचालक संघटनाही बोलण्यास तयार नाहीत. नियमांचे पालन करूनच आम्ही व्यवसाय करत असल्याचा सर्वांता दावा आहे.

प्रत्येक संघटना दुसर्‍या संघटनेकडे अंगुलीनिर्देश करीत आहे. आमच्या संघटनेचे चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेत नाहीत, असा दावा सर्वच संघटनांनी केला आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारे हे ऑटोरिक्षाचालक कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.