आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘रिस्की प्रायव्हसी’येतेय अंगलट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराच्या धकाधकीपासून थोडं दूर निसर्गाच्या सान्निध्यात मित्र-मैत्रिणींसोबत निवांत क्षण घालवण्यात गैर काहीच नाही. साºयांचाच यामागील हेतू वाईट असतो, असेही नाही; पण अशा एकांताच्या शोधात शहराबाहेर पडणाºया तरुणाईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नेमका हाच एकांत अनेकांसाठी घातक ठरू शकतो. आपल्या एकांतापेक्षा आपली व आपल्या मित्र, मैत्रिणींचा जीव, अब्रू लाखमोलाची आहे, हे तरुणाईने समजून घेण्याची गरज आहे.

काही वर्षांपूर्वी अकोला शहरातून शेगावला जाणाºया अशाच एका अल्पवयीन मित्र-मैत्रिणीसोबत जीवघेणा प्रसंग घडला होता. आजही या जखमा त्यांच्या पालकांच्या, नातेवाइकांच्या व वैदर्भीयांच्या मनावर ताज्या आहेत. अमरावतीत सुदैवाने अशी घटना घडलेली नाही. घडूही नये; पण काळ, वेळ, प्रसंग कधीही सांगून येत नाही. त्यासाठी तरुणाईने आता सावधच व्हावे.

पोलिसांची गस्त वाढणार
रहाटगाव येथील घटनेनंतर आता पोलिसांनी गस्त आणखी व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याव्दारे गैरकृत्य आणि असल्या घटनांवर नियंत्रणाचा प्रयत्न आहे.

मुला-मुलींना देणार पालकांच्या ताब्यात
निर्जनस्थळी कोणताही मुलगा किंवा मुलगी एकत्र आढळल्यास पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांना पोलिस ठाण्यात आणले जाईल. त्यांना पालकांना ताब्यात देण्यात येईल. चार्ली कमांडो आणि पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे उपायुक्त घार्गे यांनी सांगितले.
जोखीम पत्करूच नका
४ मित्र, मैत्रिणींसोबत फिरायला जाण्यात काहीच गैर नाही; पण सुरक्षा सर्वांत महत्त्वाची आहे. कुणी कितीही नाराज झाले तरी चालेल; पण असा धोका पत्करू नका.
अ‍ॅड. वर्षा देशमुख
पोलिसांना तत्काळ कळवा
४तरुणाईने सायंकाळनंतर निर्जनस्थळी जाऊ नये. काही धोका जाणवल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या. पोलिस दल आपले कर्तव्य चोख बजावेलच; पण प्रत्येकाने सतर्कता बाळगणेही गरजेचे आहे.
- सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त.

फ्लॅशबॅक बघा
1. रहाटगाव मार्गावर काही दिवसांपूर्वी पाच तरुणांनी एका 30 वर्षीय महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने पोलिस याच मार्गावर गस्तीवर होते. त्यामुळे पाचही तरुण पकडले गेले.

2. मार्डी रोडवर एका शाळकरी मित्र, मैत्रिणीला तीन युवकांनी अडवून धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पाचच्या सुमारासची ही घटना. या प्रकाराची पोलिसांत अधिकृत
नोंद नाही.

3. कोंडेश्वर मार्गावर मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीची हायवेवरून जात असलेल्या दोन ट्रकवाल्यांनी तीन दिवसांपूर्वी छेड काढली. मित्राने विरोध केल्यावर ट्रकचालकांनी त्याला मारहाण केली. दुपारी अडीच ते तीनची ही घटना. या प्रकाराचीदेखील कुठेही नोंद नाही. एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधून हा घटनाक्रम कळला.