आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भातकुली-निंभा मार्गावरचा अपघात; अपघातस्थळी सापडले चार देशी कट्टे, काडतूस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -बडनेरा ते भातकुली मार्गावरच्या निंभा फाट्यावर रविवारी (दि. 22) रात्री दोन दुचाकींमध्ये अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर पोलिस सोमवारी (दि. 23) सकाळी पुन्हा घटनास्थळी गेले असता, त्यांना दुचाकीच्या बाजूला एका पर्समध्ये चार देशी कट्टे आणि आठ जिवंत काडतूस मिळाले. हे साहित्य जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी दिली.
अपघातात बबन बकाराम सहारे (40, रा. निंभा) यांचा मृत्यू झाला, तर बबन सहारेच्याच दुचाकीवर असलेले किशोर रामाजी टिके आणि दुसर्‍या दुचाकीवरचा अमरसिंग किसनसिंग बावरी (40, रा. तळेगाव श्यामजीपंत) हे दोघे गंभीर जखमी झाले. अमरसिंगची पत्नी कीर्ती कौर बावरी हीसुद्धा किरकोळ जखमी झाली. सोमवारी सकाळी पोलिस पुन्हा अपघातस्थळावर गेले होते. त्यावेळी अमरसिंगच्या दुचाकीजवळ एका महिलेची पर्स त्यांना आढळली.
या पर्समध्ये तब्बल चार देशी कट्टे आणि आठ जिवंत काडतूस होते. या प्रकाराने पोलिसांना धक्काच बसला. ती पर्स कीर्तीकौरची असल्याचचे पोलिसांनी सांगितले. अमरसिंग हा पत्नीसह दुचाकीने (एम.एच. 27 एबी 815) बुलडाणा जिल्ह्यातील टुमकी येथून बडनेर्‍याकडे येत होते. निंभा फाट्याजवळ बबन सहारे यांच्या दुचाकीला त्यांची धडक झाली. अपघातात गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहचवल्यानंतर सोमवारी सकाळी उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बडनेरा पोलिस पथक घटनास्थळी गेले होते. तेव्हा त्यांना देशी कट्टे आणि काडतूस मिळून आले.