आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार-दुचाकीच्या अपघातात दोन जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- बडनेराकडून शहराच्या दिशेने येणार्‍या इंडिका कारची शुक्रवारी सायंकाळी रस्ता ओलांडणार्‍या दुचाकीला धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार महिला आणि कारचालक जखमी झाला. जुन्या बायपास मार्गावरील फॉरेस्ट कॉलनीसमोर हा अपघात झाला.

जिज्ञासा सुहास वाघमारे (38 रा. वामन सोसायटी, डेंटल कॉलेज परिसर) आणि नीलेश अशोक शेंडे (25 रा. न्यू प्रभात कॉलनी) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. शुक्रवारी सायंकाळी जिज्ञासा वाघमारे दुचाकीने (एम. एच.29 एच 5156) फॉरेस्ट कॉलनीच्या भागातून जुन्या बायपासवर येत होत्या. त्याचदरम्यान नीलेश इंडिका कार (एम. एच.27 एसी 1458) घेऊन बडनेराकडून शहराच्या दिशेने जात होता. या वेळी अचानकपणे जिज्ञासा यांची दुचाकी कारसमोर आली आणि अपघात घडला. नीलेशने अचानक ब्रेक लावल्यामुळे कारचे संतुलन बिघडले आणि दोन कोलांट्या घेत रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने दोन्ही जखमींना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच फ्रेजरपुरा ठाण्याचे पोलिस तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.