आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट: अखेर गिळलेल्या "त्या' रस्त्याचे झाले डांबरीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जयस्तंभते रेल्वेस्टेशन चौकादरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करताना संबंधित कंत्राटदाराने डावीकडून अडीच तर उजवीकडून साडे चार फूट रस्ता तसाच सोडून दिला होता.स्वहितासाठी कंत्राटदाराने ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या नियमांना डावलून कसे डांबरीकरण पूर्ण केले याबाबतचे वृत्त दै. ‘दिव्य मराठी’ने २८ डिसेंबरच्या अंकात ‘डांबरीकरण अपूर्ण; रस्ते गिळले कुणी?’ या मथळ्याखाली प्रकाशित केले होते. त्यानंतर याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आणि महिनाभराच्या कालावधीनंतर गुरुवारी (दि. २९) सोडलेल्या अर्धवट रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले.

जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशन हा राजकमल पुलावरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभगाच्या अखत्यारित येतो. या रस्त्याची रुंदी २८ फूट आहे. परंतु नुकतेच डांबरीकरण झालेल्या रस्त्याची रुंदी केवळ २०.५ फूट इतकीच आहे. या रस्त्याच्या डावीकडून अडीच, तर उजवीकडून साडेचार फूट रस्ता डांबरीकरण करण्याचा सोडण्यात आला होता. तो आता डागडुजी करून दुरुस्त करण्यात आला आहे. महिन्यापूर्वी शहरातील बहुतांश रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु संपूर्ण रुंद असलेल्या रस्त्यावर संपूर्ण डांबरीकरण करता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काही फूट जागा सोडून रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. उंचवटे बुजवल्यामुळेे अपघातांच्या संख्येत वाढ झाली होती. दरम्यान, तेव्हा निधीचे कारण पुढे करीत अधिकाऱ्यांनी रस्त्याचे अर्धवट बांधकाम केल्याची माहिती दिली होती. मग आता शासनाजवळ निधी आला कोठून, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

आता शासनाकडे निधी आला कोठून?
शहरातीलजेवढी रस्त्याची रुंदी आहे, तेवढे डांबरीकरण करता अर्धवट डांबरीकरण करण्यात आले होते. त्याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी निधीचे कारण पुढे केले होते. एकाच कामासाठी शासन दोनदा निधी मंजूर करते का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. तेव्हाच रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले असते, तर नागरिकांना त्रास झाला नसता. आता शासनाकडे निधी कोठून आला, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

यापूर्वी काय म्हणाले होते अधिकारी?
यापूर्वीअधिकाऱ्यांनी अफलातून कारण सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. सकाळी रहदारी, तर रात्री थंडीमुळे काम करता येत नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. मग चूक लक्षात आल्यावर कडाक्याच्या थंडीत काम करता येत नाही, त्यामुळे थंडी कमी झाल्यावर शिल्लक राहिलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर अखेर गुरुवारी (दि. २९) उर्वरित रस्त्याची डागडुजी करण्यात आली.

ही तर ‘साबांवि’ची काम करण्याची पद्धत
-रस्त्याचे बांधकाम एकदम करता येत नाही. ही काम करण्याची पद्धत आहे. किंबहुना साबांविची ती कार्यपद्धती आहे. यापूर्वी काही कारणास्तव काम करता आले नाही. रस्त्याची जेवढी रुंदी आहे, तेवढ्या रस्त्यावरच डांबरीकरण होईल. नागरिकांना वेठीस धरले जाणार नाही. जे.एच. भानुसे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.