आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखोरांच्या टोळक्यांना शहरात कसे घालणार वेसण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विद्यार्थिनी, शिक्षिका, कर्मचाऑंच्या होणाऑ छळवणुकीला आळा घालण्यासाठी कागदोपत्री समित्या स्थापून बैठक घेणारी शाळा-महाविद्यालये आपल्याच शैक्षणिक संस्थेचे प्रवेशद्वार ओलांडल्यावर तरुणींच्या सुरक्षेसाठी परकी ठरत आहेत.

विद्यार्थिनी, शिक्षिका, शिक्षकेतर महिला कर्मचाऑंच्या लैंगिक छळवणुकीला आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक महाविद्यालयात समिती स्थापन करण्यात आली आहे. बहुतांश शाळांमध्येही अशी समिती आहे. सुमारे दहा सदस्यांची जम्बो समिती प्रत्येक शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहे. या समित्यांची कागदोपत्री बैठकही होते. पण, अशा अनेक महाविद्यालयांच्या कंपाउंड वॉलला अगदी चिटकून असलेल्या चहा, पान टपऑंवरून जेव्हा टपोरी युवक विद्यार्थिनींना छेडतात, त्यावेळी मात्र अशा सर्व संस्था पोलिसांवर अवलंबून असतात. मुली, महिलांच्या सुरक्षेबाबत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ वगळता कोणाजवळही स्वत:ची भक्कम अशी यंत्रणा नाही. आजपर्यंत एकाही शैक्षणिक संस्थेकडून मुलींची छेडखानी होत असल्याची एकही लेखी तक्रार पोलिसांना मिळालेली नाही. पण, विनयभंग, मुलींचा पाठलाग, शेरेबाजी, छेडखानीला बळी पडणा-यामध्ये अमरावती शहरातीलच...

इथे राजरोस वावरतात टवाळखोरांच्या टोळ्या
पंचवटी चौक : सर्वाधिक कॉलेजेसचा परिसर. सरासरी 550 ते 600 युवती याच परिसरात असतात.
अंबादेवी रोड : गांधी चौकाचा परिसर, जवाहर गेट रोड, परिसर.
विमवि रोड : शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अभियांत्रिकी, व्हीएमव्ही कॉलेज, फार्मसी कॉलेजचा परिसर असल्याने शेगाव नाका, कठोरा नाक्यावर अनेक टवाळखोर असतात.
सीसीटीव्हीचा अभाव : शैक्षणिक कामकाजावर, वसतिगृहांवर नजर ठेवण्यासाठी बोटावर मोजण्याइतक्या संस्थांमध्ये क्लोज सर्किट कॅमेरा प्रणाली कार्यान्वित आहे. अनेक नामांकित कॉलेज, वसतिगृहांमध्ये ही यंत्रणा नाही.

कॉलेज परिसरात सुरक्षा
- महाविद्यालयीन तरुणींना महाविद्यालय परिसरामध्ये सुरक्षा मिळते. त्यासाठी प्रत्येक कॉलेज, वसतिगृहांमध्ये समित्याही कार्यरत आहेत. पण, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या बाहेरचा प्रश्न जेव्हा येतो, त्यावेळी हा मुद्दा खूपच व्यापक असतो.
डॉ. अजय देशमुख, संचालक, बीसीयूडी (अमरावती विद्यापीठ)