आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयस्तंभ चौकातील सिग्नल टिमटिमणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील वाहतूक सिग्नल सौर ऊज्रेवरून महावितरणच्या ऊज्रेवर सुरू झाले आहेत. एलईडी स्वरूपातील शहरातील 16 सिग्नलपैकी सात सिग्नल ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाठपुराव्यानंतर पुन्हा सुरू झालेत. उर्वरित सिग्नल सुरू करण्यासाठी बुधवारी शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे अधिकारी, सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करणारे महापालिकेचे दोन तंत्रज्ञ, शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे तंत्रज्ञ आणि ‘दिव्य मराठी’च्या विद्युत विभाग तज्ज्ञाच्या मदतीने आढावा घेण्यात आला. सिग्नल का बंद पडले व ते सुरू करण्यासाठी कोणते उपाय करता येतील, याबाबत या तज्ज्ञांनी चर्चा केली. तंत्रशिक्षण उपसंचालक सागर पासेबंद, शासकीय तंत्रनिकेतनचे विभागप्रमुख हेमंत जोशी यांनीही यासाठी सहकार्य केले.

लेनिंगसाठी अनोखी आयडीया
शहरातील चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग नाही. चौकांमध्ये डावीकडे वळण्यासाठी लेनिंग नाही. ही समस्याही पोलिस उपनिरीक्षक नीलेश पाटील यांनी मांडली. पोलिस ठाण्यांमध्ये अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या सायकली आणि लोखंडी साहित्य उपलब्ध झाल्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने सायकलच्या दांड्याचे स्टॅन्ड तयार करून त्याला लोखंडी चेन वेल्ड करता येईल. या दांड्यांना रेडियम रिफ्लेक्टर बसवून प्रत्येक चौकात ते डांबरी रस्त्यात ठोकता येतील, अशी अनोखी कल्पनाही सूचवण्यात आली.

झेब्रा क्रॉसिंगची मागणी
शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग नाही. त्यामुळे या चौकांमध्ये सिग्नलवर थांबणारे वाहनचालक बेशिस्तपणे थांबतात. परिणामी वाहतूक पोलिसांना कारवाई करताना अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक चौकात झेब्रा क्रॉसिंग आणि स्टॉप लाइन पेंट करून द्यावी, अशी मागणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे करण्यात आली. याबाबत महापालिकेला पत्र पाठवणार आहे. शहरातील बहुतांश रस्ते पीडब्ल्यूडीच्या कार्यक्षेत्रात असल्याने पट्टे कोण आखणार, हा मुद्दा आहे.