आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तासांत साडेतीन लाखांची घरफोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमरावती - शहरातील पाटीपुरा परिसरात राहणार्‍या एका व्यक्तीच्या घरातून आवघ्या दोन ते तीन तासात चोरट्यांनी तब्बल लाख ४६ हजारांची रोख चार हजारांचे दागिने आसा साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही चोरी गुरूवारी दुपारच्या सुमारास झाली आहे. या प्रकरणी गुरूवारी रात्री नागपूरी गेट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शहरात एकापाठोपाठ एक होणार्‍या चोरीसत्रामुळे नागरीकांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

मोहम्मद साबीर आब्दुल गफ्फार (३९) यांचे पाटीपुरा परिसरात घर आहे. गुरूवारी दुपारी आडीच वाजताच्या सुमारास ते घरातून मोबाईल खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी घरातील कपाटात त्यांनी लाख ४६ हजार रुपयांची रोख ठेवली होती. घर बंद आसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने घरात प्रवेश केला. यावेळी कपाटाचे कुलूप तोडून लॉकरमध्ये आसलेली रोख चार हजारांचे दागिने आसा साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मोहम्मद साबिर यांनी एक मालमत्ता विकली होती. याच मालमत्तेच्या विक्रीपोटी मिळालेली ही रक्कम होती, हा व्यवहार बुधवारी (दि.६) पार पडला होता. आसे नागपूरी गेट पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी तक्रारीवरून नागपूरी गेट पोलिसांनी आज्ञाताविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

चोरट्यांचा मनमोकळा वावर : शहरातमागील पंधरा दिवसांपासून सुरू आसलेले चोरीसत्र आद्याप थांबलेले नाहीत. इतकेच काय तर आलीकडच्या काळात घडलेल्या मोठ्या चोर्‍या, वाटमारी, मंगळसूत्र चोरी प्रकरणातील चोरट्यांना आटक करण्यात पोलिसांना आजूनही यश आलेले नाही. शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील सारथी साडीजमधील लाख ३३ हजारांची चोरी, त्यानंतर कोतवाली हद्दीत झालेली १२ लाख ५० हजारांची वाटमारी, राजापेेठ ठाण्याच्या हद्दीत नगरसेविका कांचन डेंडूले यांच्या घरात झालेली साडेचार लाखांची चोरी, मंगळसूत्र चोरी, बडनेरा ठाण्याच्या हद्दीत झालेला खुन या सर्व घटनांमधील गुन्हेगार मोकाटच आसतानाच गुरूवारी पुन्हा साडेतीन लाखांची चोरी शहरात झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...