आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन लाखांचे सोने दुर्गा विहारातून लंपास; कपाटातील वस्तू ‘जैसे थे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- दुर्गा विहारमध्ये राहणार्‍या एका प्राध्यापकाच्या घरातून साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

प्रा. रविकांत नागोराव कोल्हे (43) हे भुस्कटे यांच्या घरी भाड्याने राहतात. ते चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पहिल्या माळ्यावर कोल्हे कुटुंब राहते. रविकांत कोल्हे यांच्या ज्येष्ठ बंधूच्या घरी महालक्ष्मी असतात. बुधवारी ते कपाटातील लॉकरमधून महालक्ष्मीसाठी दागिने काढण्यास गेले. मात्र, आज दागिने त्या ठिकाणी नव्हते. कपाटातील इतर वस्तू मात्र कायम आहेत. तेथे तब्बल 122 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. कोल्हे यांच्या कुटुंबात मुलगा, प}ी असे तीनच सदस्य आहे. चोरीची माहिती कोल्हे यांनी सायंकाळी राजापेठ पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक सचिन पुंडगे ताफ्यासह घटनास्थळी गेले. त्यांनी पाहणी केली. गेल्या 27 ऑगस्टला लॉकर उघडले होते. तथापि, त्यावेळी घरात दुसरे कोणीही नव्हते, असे कोल्हे यांनी पोलिसांना सांगितले. कदाचित त्याच दिवशी चोरी झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.

चौकशीअंती गुन्हा दाखल करणार
प्रकरणाची तक्रार आली आहे. मात्र, चोरी केव्हा झाली, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रकरणाची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करणार आहे.
-संजय देशमुख, ठाणेदार, राजापेठ.