आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात एकाच रात्री तीन घरफोड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरात सोमवारी (दि. 27) रात्री तीन घरफोड्या झाल्या. यामध्ये चोरट्यांनी सव्वा लाखांहून अधिक ऐवज लंपास केला. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

पहिली घटना
राजापेठ ठाण्याच्या हद्दीत सातुर्णा परिसरातील रामवाटिका येथील रहिवासी सुमन सुरेश शर्मा यांच्याकडे घडली. चोरट्यांनी येथून 30 हजारांना गंडा घातला. शर्मा यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एका संशयितावर पोलिसांची नजर आहे. मात्र, अद्याप त्याला ताब्यात घेतलेले नाही.

दुसरी घटना
खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत सातखिराडी भागात घडली. बसवेश्वर चौकातील रहिवासी निखिल संजय सावरकर यांचे घर चोरट्यांनी फोडले. येथून दोन सोन्याच्या बांगड्या, महालक्ष्मीचे चांदीचे मुकुट आणि कुबेराची चांदीची मूर्ती असा एकूण 81 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सावरकर यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.

तिसरी घटना
नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत इतवारा चौकातील रहिवासी शेख इब्राहिम शेख गुलजार यांच्या घरातून तीन हजार रुपये किमतीची म्युझिक सिस्टीम चोरट्यांनी लंपास केले. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली. शे. इब्राहिम यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.