आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडनेरात तीन लाखांची घरफोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेराजुनी वस्तीमध्ये चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचे दािगने, चांदीच्या लक्ष्मी मूर्तीसह जवळपास तीन लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. जयमाला नारायण ढेंगे (५०, रा. जुनीवस्ती, बडनेरा) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी मागच्या दाराने घुसून कपाटातील दािगने, चांदीचे शिक्के, तीन मोबाइल लंपास केले. शुक्रवारी सकाळी ढेंगे कुटुंबीयांना पूजेवर ठेवलेली चांदीची मूर्ती दिसली नाही. कपाटातील सािहत्य अस्ताव्यस्त आढळले. चोरी झाल्याचे लक्षात येताच बडनेरा पोिलसांना माहिती देण्यात आली. पोिलसांनी घटनास्थळाची पाहणी केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम, एपीआय रवि राठोड, एपीआय सुमित परतेकी आपआपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. श्वानपथक ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पहाटे पाऊस झाल्यामुळे श्वान शोध घेऊ शकले नाहीत. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

चोरीला गेलेले दागिने
मंगळसूत्र५५ ग्रॅम, अंगठ्या ३० ग्रॅम
सोनसाखळी १४ ग्रॅम, टॉप ग्रॅम
रिंग ग्रॅम, चांदीची लक्ष्मी मूर्ती हजार ८०० रुपये, १० हजार रुपयांचे चांदीचे शिक्के, मोबाइल. पाच हजारांची रोख असा जवळपास तीन लाख ३१ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा चाेरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत अाहे.