आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापार्‍याकडे आठ लाखांची चोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- गणेश कॉलनी परिसरातील जयगुरूनगरमध्ये मंडप डेकोरेशन व्यावसायिकाच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी 220 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह दीड लाखांची रोकड असा एकूण आठ लाखांचा ऐवज लंपास केला. ही चोरी शुक्रवारी उघडकीस आली.

रमेश गुलाबराव काठोडे यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. जयगुरूनगरमध्ये त्यांचे दोन माळ्याचे घर आहे. खालच्या भागात गोदाम असून, पहिल्या माळ्यावर पाच खोल्या आहेत. त्याच ठिकाणी काठोडे कुटुंबासह राहतात. विशेष म्हणजे, त्यांच्या घराचे दरवाजे कधीही बंद नसतात. गुरुवारी रात्रीसुद्धा दरवाजे उघडेच होते. शयनकक्षात अलमारीमध्ये दागिने आणि रोकड होती.

तिला कुलूप लागलेले नसल्याचे काठोडे यांनी पोलिसांना सांगितले. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवून अलमारीमध्ये असलेला दागिन्यांचा डबा लंपास केला. यात 70 ग्रॅम, 50 ग्रॅमचे प्रत्येकी एक, 12 ग्रॅमचे दोन असे चार मंगळसूत्र, 30 ग्रॅम आणि 15 ग्रॅमच्या दोन सोनसाखळ्या, 10 ग्रॅमची अंगठी आणि 20 ग्रॅमची चार कर्णफुले असे 219 ग्रॅमचे दागिने होते. याच डब्याखाली दीड लाख रुपयांची रोकड होती. चोरट्याने दागिन्यांच्या डब्यासह दीड लाखांची रोकड घेऊन पोबारा केला.

‘बच्चा’ झाला शांत
काठोडे यांच्या घरी ‘बच्च’ नामक कुत्रा आहे. गुरुवारी (दि. 6) दुपारपासून तो शांत पहुडलेला आहे. तो भुंकत नाही तसेच त्याच्या क्रिया मंदावल्या आहेत. चोरट्यांनी ‘बच्च’ला काही खायला घातले का, अशी शंका काठोडे यांनी व्यक्त केली आहे.

व्यापार्‍याकडे आठ लाखांची चोरी
आणि सुचित तसेच पत्नी राजकन्या यांच्यासमवेत रात्री घरात झोपले होते. मात्र, ज्या खोलीत आलमारी होती, त्या खोलीत कोणीच नव्हते. शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास राजकन्या यांनी पैसे काढण्यासाठी कपाट उघडले तेव्हा दागिन्यांचा डबा आणि रोकड त्यांना दिसली नाही. यानंतर घरात चोरी झाल्याचे उजेडात आले. राजापेठ पोलिसांना याबाबत तातडीने माहिती देण्यात आली. राजापेठ पोलिस, गुन्हे शाखा पोलिस तसेच श्वानपथकाला काठोडे यांच्या घरी पाचारण करण्यात आले होते. या वेळी उपायुक्त संजय लाटकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमेश आत्राम, राजापेठचे दुय्यम निरीक्षक भास्कर मसराम, उपनिरीक्षक नितीन थोरात, गौतम वावळे यांच्यासह मोठय़ा प्रमाणात पोलिस हजर झाले होते.

चांदीच्या मूर्ती सहीसलामत
अलमारीत ज्या ठिकाणी दागिन्यांचा डबा आणि रोकड चोरीला गेली, तेथेच चांदीच्या तीन मूर्ती, चांदीचे नाणे, आठ हजारांची रोकड होती. मात्र, चोरट्यांनी ते नेले नाही