आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robbery Requested Court Take Action Immediately, Divya Marathi

तत्काळ निकाल लावण्याची दरोडेखोरांची न्यायालयाला विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- खंडेलवाल ज्वेलर्स दरोडा प्रकरणाचा निकाल त्वरित लावण्यात यावा, अशी विनंती आरोपींनी येथील विशेष मोक्का न्यायालयाला केली आहे.
खंडेलवाल ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील आरोपीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. सध्या हे प्रकरण येथील विशेष मोक्का न्यायालयात न्यायाधीश एस. एस. दास यांच्या न्यायालयात सुरू आहे. आरोपींनी याच न्यायालयात हा विनंती अर्ज केला असल्याची माहिती मिळाली आहे. या अर्जानंतर गुरुवारी (दि. 27) जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी एच. बी. कुंटे हे न्यायालयात आले होते. आरोपींनी न्यायालयात अर्ज केल्याच्या बाबीला त्यांनी दुजोरा दिला आहे.
शहरातील जयस्तंभ चौक या भर रहदारीच्या भागात असलेल्या खंडेलवाल ज्वेलर्स या प्रतिष्ठानात घुसून बंदुकीच्या धाकावर सिनेस्टाईल दरोडा घालण्यात आला होता. आरोपींनी दोन रिव्हॉल्व्हरच्या धाकावर घातलेल्या या दरोड्याचे संपूर्ण चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले होते. कोणताही पुरावा आरोपींनी सोडलेला नसताना दरोड्याच्या वेळी फक्त मोबाइलवरून करण्यात आलेल्या कॉलचा शोध लावून हा तपास पूर्ण करण्यात पोलिसांना यश आले होते.