आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आज करणार विदर्भात रास्ता रोको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, भूसंपादन कायद्यातील शेतकरीविरोधी तरतुदी, कामगार कायद्यातील कामगारविरोधी बदल यांसह अनेक मुद्द्यांवर केंद्र तसेच राज्य सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी फेब्रुवारीला विदर्भातील सर्व जिल्ह्यांत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळाचा पुस्तिकेच्या माध्यमातून समाचार घेणाऱ्या काँग्रेसने राज्यस्तरीय रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत उद्या रास्ता रोको आंदोलन तसेच मोर्चे काढले जाणार आहेत. संघटनात्मक बाबी तसेच आंदोलनासाठी काँग्रेसने जिल्हानिहाय नेत्यांची खास नियुक्ती केली आहे. नागपुरातील आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अमरावती येथील आंदोलनाचे नेतृत्व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके करणार आहेत. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे बुलडाणा, सुरेश शेट्टी यांच्याकडे वर्धा, तर अनिस अहमद यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्यातील आंदोलनाची जबाबदारी दिली आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडे चंद्रपूर, तर राजेंद्र मुळक यांच्याकडे भंडारा जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. वाशीम जिल्ह्यात रणजित कांबळे, गोंदिया जिल्ह्यात गोपाळदास अग्रवाल, अकोला जिल्ह्यात डॉ. उल्हास पाटील, तर यवतमाळ जिल्ह्यात माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे.