आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Role Of Sobhatai Fadnavis About Different Vidarbha

शोभाताई मांडणार आता विदर्भाची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- केंद्र, राज्यात भाजपचे सरकार असताना नागपुरात टोलविरोधी आंदोलन करून राजकीय चर्चा निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या काकू भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस आता वेगळ्या विदर्भावर भूमिका मांडणार आहेत.
शोभाताईंनी नागपुरात टोलविरोधी आंदोलन करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. त्यांच्या त्या आंदोलनाचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले गेले. पक्ष सत्तेत असताना आंदोलन कशासाठी, कोणाच्या विरोधात, असा प्रश्न भाजपच्या नेत्यांनाही पडला होता. भाजपचे कार्यकर्तेही गोंधळात होते. त्या आंदोलनाची चर्चा कायम असताना शोभाताई फडणवीस आता व्याख्यानातून वेगळ्या विदर्भाची गरज यावर भूमिका मांडणार आहेत. नागपुरातील विदर्भवादी संघटना जनमंचने रविवारी सायंकाळी वाजता चिटणवीस सेंटर येथे त्यांच्या वेगळा विदर्भ कशासाठी? यावरील जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. त्यांच्या नागपुरातील सक्रिय होण्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यासंदर्भात शोभाताई फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, केंद्र राज्यात भाजपचे सरकार असल्याने येत्या पाच वर्षांत विदर्भाचा विकास निश्चित होणार आहे. मात्र, त्यानंतरही वेगळ्या विदर्भाची गरज कायम राहील, असे आपले प्रामाणिक मत आहे. यापूर्वीही आपण वेगळ्या विदर्भाची भूमिका वारंवार मांडली आहे. त्यामुळे ती बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक मांडली जाणार आहे, असे समजण्याचे कारण नाही.