अमरावती- रस्त्यांवरधावणाऱ्या ऑटोंच्या तपासणीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी आता पुढे सरसावले आहेत. शुक्रवारी (दि. ५) आरटीओतील परिवहन उपनिरीक्षक, निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील काही ऑटोंची आकस्मिक तपासणी केली. ऑटोंचे नोंदणी प्रमाणपत्र, चालकांचे लायसन्स, प्रदूषण प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्रासह मीटरचीदेखील तपासणी केली. दरम्यान, दोषी आढळलेल्या काही ऑटोचालकांना दंड ठोठावण्यात आला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेतील विभागीय परिवहन समितीच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. शंभर किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे जितके भाडे आहे, तितकेत भाडे शहरात ऑटोतून फिरण्यासाठी मोजावे लागते. याबाबत "दिव्य मराठी' सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे, आता प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी प्रशासनालाही एक पाऊल पुढे येण्याशिवाय गत्यंतर नाही. स्पेशल ऑटो घेतल्यास मीटरनेच भाडे आकारणी करण्यात यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. नागरिकांच्या या अपेक्षाही "दिव्य मराठी'ने प्रतिक्रिया स्वरूपात प्रकाशित केल्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय परिवहन समिती, शहर वाहतूक पोलिस शाखा, आरटीओ, लोकप्रतिनिधी लोकांच्या की, ऑटो चालकांच्या बाजूने निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
राकाँकाढणार व्हीप :एनसीपी फ्रंटगटनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने काळे मार्डीकर या दोघांकडून व्हीप काढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष स्तरावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांकडून व्हीप जारी होणार असल्याची माहिती आहे. पालिकेतील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले सदस्य प्रदेशाध्यक्षांचा व्हीप मानणार की गटनेते यांचा, हे मंगळवारी स्पष्ट होईल.