आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओसमोरील काढले अतिक्रमण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- प्रादेशिकपरिवहन कार्यालयासमोर च्या जागेवर केलेले अतिक्रमण पालिकेच्या अतिक्रमण विरोध पथकाने शुक्रवारी (दि. २६) हटवले. अपंग व्यक्तीस व्यवसायाकरिता ही जागा देण्यात आली होती, मात्र त्याच्याकडून अतिक्रमण करण्यात आल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
अमरावती कॅम्प शीट क्रमांक १९ भूखंड क्रमांक सात आरटीओ कार्यालय समोरील महापालिका संकुल जवळची १२० चौरस फूट जागा आबिद खान दाऊद खान या अपंग व्यक्तीस व्यवसायाकरिता देण्यात आली होती; परंतु या व्यक्तीकडून अन्य जागेवर अतिक्रमण करण्यात आले. अतिक्रमण करण्यात आलेले बांधकाम ११ ऑगस्ट १४ रोजीच काढले जाणार होते. अतिक्रमणधारकास १२ जुलै २०११ रोजी याबाबत १६२९ क्रमांकाच्या पत्रानुसार कळवण्यात आल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. विद्युतपुरवठा खंडित करण्याबाबत ऑगस्ट रोजी कळवण्यात आले होते. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभाग प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल, निरीक्षक उमेश सवाई, जागा निरीक्षक गणेश कुत्तरमारे तसेच गाडगेनगर पोलिस कारवाईत सहभागी झाले होते. आरटीओ कार्यालयासमोरील अतिक्रमण काढताना महापालिकेचे पथक.