आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्रामाचे खरे सूत्रधार घोष - मनोज शर्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती'-‘स्वातंत्र्यसंग्रामाला दिशा देणार्‍यांमध्ये योगी अरविंद यांचे महत्त्वाचे स्थान होते. स्वातंत्र्यसंग्रामाचे ते खरे सूत्रधार होते. मात्र, इतिहासकारांनी त्यांच्या कार्याची फारशी दखल घेतली नाही. र्शी अरविंदांची भारताची संकल्पना आदर्श होती. ‘भारत माझ्यासाठी आईसारखा आहे’, असे ते म्हणत. त्यामुळे भारताच्या जाज्वल्य इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेले अरविंद घोष यांचे विचार आज अभ्यासायलाच हवेत,’ असे मत भोपाळ येथील र्शी अरविंद क्षेत्रीय समितीचे सचिव मनोज शर्मा यांनी व्यक्त केले. गाडगेनगरमधील र्शी अरविंद योग सेंटरमध्ये बुधवारी महर्षींच्या अमरावती आगमनाच्या स्मृतीला उजाळा देणारी व्याख्याने झाली. त्या वेळी ते बोलत होते.
28 व 29 जानेवारी 1908 रोजी र्शी अरविंद घोष अमरावती येथे आले होते. त्यांच्या आगमनाच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि र्शी अरविंद योग सेंटरच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. दोन सत्रांमध्ये अरविंदांच्या अभ्यासकांची व्याख्याने पार पडली. ‘र्शी अरविंद : राष्ट्रवाद और अध्यात्म के संगम’ आणि ‘र्शी मातृ स्मरण’ या विषयावर शर्मा यांची दोन व्याख्याने झाली. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील सुरेश चोपडे, तर माजी मंत्री सुरेंद्र भुयार हे दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त प्राध्यापक पी. एन. देशमुख यांचे ‘र्शी अरविंदचे सुरतनंतर मुंबई येथील भाषण’ या विषयावर व्याख्यान झाले. ‘र्शीमाँचे अवतारकार्य’ या विषयावर दर्यापूर येथील गुलाबराव कळसकर यांनी मत मांडले. नागपूरचे उद्धवराव वानखडे यांच्या भाषणानंतर मेहकर येथील नीळकंठ अजबे यांनी र्शी अरविंद यांचे शिक्षणविषयक विचार स्पष्ट केले. र्शी अरविंद घोष यांचे तत्त्वज्ञानी व्यक्तिमत्त्व, त्यांचे शिक्षणविषयक विचार, योगी, महाकवी, युगप्रवर्तक अशा र्शी अरविंद यांच्या विविध भूमिका मान्यवरांनी भाषणांतून मांडल्या. अरविंदांच्या अनुयायांची या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. र्शी अरविंद योग सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ पडोळे, सचिव डॉ. माया मोंढे, कोशाध्यक्ष व्ही. एम. हरणे, उपाध्यक्ष डॉ. आर. पी. वाठोडकर, डॉ. अरुण मोंढे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी आयोजनासाठी पर्शिम घेतले.
श्री अरविंद घोष यांच्या 1908 मधील आठवणी
महर्षी योगी र्शी अरविंद घोष हे 28 व 29 जानेवारी 1908 रोजी अमरावतीमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी खापर्डे वाड्यामध्ये मुक्काम केला होता. तत्कालीन परकोटाच्या आत असलेल्या इंद्रभुवन आणि जोशी हॉलमध्ये त्यांचे भाषण झाले होते. त्या वेळी इंग्रजांकडून भारतीयांवर अत्याचार वाढले होते. आपल्याला स्वातंत्र्याची का गरज आहे, स्वातंत्र्यसंग्रामाची दिशा कशी असेल, या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले होते. तत्कालीन आठवणींना व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख प्रा. पी. एन. देशमुख यांनी उजाळा दिला.