आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Gadagebaba Gram Swacchata Abhiyan, 120 Village Clean

संत गाडगेबाबांच्या जिल्ह्यात अवघी 120 गावे झाली स्वच्छ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारे व स्वच्छतेसाठी स्वत: हातात झाडू घेणार्‍या संत गाडगेबाबांच्या जिल्ह्यात या विषयात कमालीची अनास्था दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांत 843 पैकी केवळ 120 ग्रामपंचायतीच निर्मल ग्राम स्वच्छता अभियानांतर्गंत देण्यात येणार्‍या पुरस्काराच्या मानकरी ठरू शकल्या.

ग्रामस्वच्छतेसाठी संत गाडगेबाबांनी आपले आयुष्य खर्ची घातले. स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी बाबांनी गावची गावं पालथी घातली. परंतु, अद्यापही गावकर्‍यांमध्ये जागृती न झाल्याने खेड्यापाड्यांत घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. ग्रामस्वच्छतेसाठी केंद्राच्या वतीने निर्मल ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत स्वच्छ गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात एक ते दहा लाखांचे बक्षीस देण्यात येते. शिवाय प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 50 हजार ते पाच लाखांपर्यंत निधी मिळतो. तरीही ग्रामपंचायत प्रशासन व गावकर्‍यांच्या अनास्थेमुळे गावे स्वच्छ होऊ शकलेली नाहीत. 843 ग्रामपंचायतींपैकी 120 गावे स्वच्छ ठरली, तर 97 गावे हागणदरीमुक्त होऊ शकली. त्यामुळे गाव निर्मल राहण्याबाबतची अनास्था असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांनी जागरूक व्हावे
गावकर्‍यांची स्वत:च्या आरोग्याबाबतही कमालीची अनास्था दिसून येते. घरची महिला उघड्यावर शौचास जाते याचीही लज्जा गावकर्‍यांना नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. गावे स्वच्छ झालीत, तर त्याचा फायदा त्यांनाच होईल. आपल्या स्वत:च्या आरोग्यासाठी तरी निदान गावकर्‍यांनी जागरूक होऊन गाडगेबाबांचा वसा पुढे चालवावा.
-अरुण मोहोड, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत)