आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santagadage Baba Amravati University News In Marathi

विद्यापीठ परीक्षेमध्ये बारकोड ‘अशक्य’? प्राधिकरणाकडून बार कोडला मान्यता नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये बार कोड प्रणाली लागू करण्याची शक्यता धूसर झाली,’अशी माहिती आहे. परीक्षा विभागाने तयारी केली असली, तरी विद्यापीठाच्या प्राधिकरणांकडून ‘बार कोड प्रणाली’ला मान्यता मिळाली नाही.
महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या शैक्षणिक पद्धतीत बदल केले जात आहेत. शासनाच्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे असले, तरी विद्यापीठाचे प्रशासन त्यासाठी अपुरे पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यातील काही विद्यापीठांत परीक्षा प्रणालीत बदल केले; मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ त्या तुलनेत मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. माजी कुलगुरू डॉ. कमलसिंह यांच्या कार्यकाळात अभियांत्रिकी विज्ञानातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा नवीन प्रणालीनुसार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र परीक्षा विभागाचे कार्य संथगतीने सुरू आहे. बार कोड प्रणालीनुसार परीक्षा घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाकडून बोलले जात आहे. मात्र, त्यावर निर्णय घेतला नसल्याचे वास्तव आहे. परीक्षा विभागाकडून बार कोड प्रणाली लागू करण्याबाबत चाचणी केली. मात्र, परीक्षेमध्ये प्रणाली लागू होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. १८ मार्च पासून विद्यापीठाच्या परीक्षा आरंभ होणार असून, त्याकरिता उत्तर पत्रिका छपाई करण्याचे नियोजनदेखील विद्यापीठाला करावे लागते. एक महिना शिल्लक असताना बार कोड उत्तर पत्रिकांचे नियोजन विद्यापीठाकडून कसे होईल, असा प्रश्न आहे. परीक्षा विभागाकडून बार कोड प्रणाली लागू करण्याबाबत चाचण्या घेतल्या. विभागाकडून प्रणालीबाबत विश्वासार्हता निर्माण झाल्यानंतर परीक्षा मंडळाकडे हा विषय पाठवल्याची माहिती आहे, दुसरीकडे बार कोड या प्रणालीनुसार होणाऱ्या परीक्षेचेदेखील विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता कायम राहणार आहे.
नागपूर जळगाव पॅटर्न-
राष्ट्रसंततुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या दोन विद्यापीठांमध्ये बारकोड प्रणाली लागू केल्याची माहिती आहे. या दोन विद्यापीठांचा आधार घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून त्याबाबत प्रक्रिया केली. मात्र, आगामी परीक्षेसाठी बार कोड लागू होणार किंवा नाही, विद्यापीठ प्रशासनात संभ्रमावस्था कायम आहे.
तीव्र गतीने कार्य सुरू-
परीक्षेमध्ये बार कोड प्रणाली आरंभ करण्याबाबत विद्यापीठामध्ये तीव्र गतीने कार्य केले जात आहे. परीक्षा विभागाकडून याबाबत प्रक्रिया पूर्ण केली आहे. आगामी सत्रात प्रायोगिक तत्त्वावर काही परीक्षांसाठी बार कोड प्रणाली लागू होऊ शकते. ही प्रणाली लागू करण्याबाबत अद्याप व्यवस्थापन परिषदेकडून मान्यता मिळाली नाही. २०१५-१६ या शैक्षणिक सत्रापासून ही प्रणाली आरंभ होण्याची शक्यता आहे. डॉ.जयंत वडते, परीक्षा नियंत्रक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.