आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक भान: हिंदू स्मशान'ला विद्यापीठातर्फे लाकडे दान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील उद्यान विभागामार्फत छाटणी केलेली जळावू लाकडे शहरातील हिंदू स्मशान संस्थेला विनामूल्य दान देण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेत व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला होता.
त्यानुसार, जवळपास 35 टन जळावू लाकडे हिंदू स्मशान संस्थेला सुपूर्द करण्यात आली.
स्थानिक हिंदू स्मशान संस्थेमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा तुटवडा भासत असल्याची माहिती समोर आली होती. त्याची दखल विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने घेतली. सदस्य सोमेश्वर पुसदकर यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांनी एकमताने विद्यापीठ परिसरातील जळावू लाकडाची विक्री करता हिंदू स्मशान संस्थेला देण्याचा निर्णय घेतला.
नाममात्र देणगीतून अंतिम संस्कार इतर विधीची व्यवस्था करणारी हिंदू स्मशान संस्था ही शहरातील एकमेव संस्था असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सामाजिक कार्यात असलेला सहभाग आणि दृष्टिकोन लक्षात घेता, संस्थेकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व जळावू लाकडे विनामूल्य दान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जवळपास ३५ टन जळावू लाकडे हिंदू स्मशान संस्थेला सुपूर्द करण्यात आली. या वेळी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि हिंदू स्मशान संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत होत आहे.