आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतांचे विचारच समाजाला वाचवू शकतात : अरुण अडसड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संतांच्यासाहित्यात समाजाचे विचार परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आहे. संतांचे विचारच समाजाला वाचवू शकतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय किसान मोर्चाचे महासचिव अरुड अडसड यांनी केले. येथील श्री संत नरहरी महाराज चौक नामकरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सुरेश काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेमकरण कांकरीया, ज्ञानेश्वर कुर्वे, दिलीप ढोमणे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत धामणगाव-अंजनसिंगी मार्गावरील चौकाला श्री संत नरहरी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. या प्रसंगी सुवर्णकार समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत डुमरे यांनी केले. प्रास्ताविक आभार प्रदर्शन मनोहर काळे यांनी केले.
चौकाच्या फलाचे उदघाटन करताना मान्यवर.
बातम्या आणखी आहेत...