आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचपदाचा वाद, पोलिस वाहनाची तोडफोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- तालुक्यातील वडगाव (माहोरे) येथील सरपंच पदाची निवडणूक तगड्या पोलिस बंदोबस्तात बुधवारी पार पडली. नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये एका गटाचे पाच तर दुसऱ्या गटाचे चार सदस्य निवडून आले. पाच सदस्य निवडून आलेल्यापैकी एक सदस्य मागील चार दिवसांपासून गावातून बेपत्ता होता.
बुधवारी सकाळी त्याने नांदगाव पेठ ठाण्यात जाऊन पोलिस संरक्षणाची मागणी केली. यावेळी नांदगाव पेठ पोलिस त्या सदस्याला घेऊन गावात जाताच शेकडोंच्या जमावाने त्याला जबरीने पोलिसांकडून स्वत:च्या ताब्यात घेतले. यावेळी शेकडोच्या जमावाने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करून दगडफेसुध्दा केली. त्यामुळे गावातील वातावरण चांगलेच तापले होते. शेवटी तगड्या बंदोबस्तात सरपंचाची निवडणूक पार पडली.
वडगाव माहोरे ग्रामपंचायतसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यानिवडणूकीत गावातील दोन गटाचे नऊ सदस्य निवडणूक आले आहे. यापैकी एका गटात कोळीळा आठवले, मीना कावनपूरे, नितीन पंजाबराव गवळी, दिलीप पाटील आणि माधूरी लंगडे हे पाच सदस्य तर दुसऱ्या गटामध्ये शशिकांत माहोरे, प्रफुल्ल माहोरे, रोषणी माहोरे आणि नंदा माहोरे या चार सदस्यांचा समावेश आहे. याचवेळी सरपंच पदासाठी अनुसुचित जातीचे रोस्टर निघाले होते.
ज्या गटाचे पाच सदस्य निवडूण आलेले होते. त्या पाच सदस्यापैकी कोकीळा आठवले नितीन गवळी हे सदस्य अनुसुचित जातीमधून निवडूण आलेले होते. त्यामुळे या दोघांपैकींच एक जण सरपंच म्हणून निवडूण येणार हे निश्चित होते. असे असले तरी मेपासून नितीन गवळी हे गावातून बेपत्ता होते. नितीन गवळी बेपत्ता असल्यामुळे त्यांच्या गटांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. बुधवारी मे रोजी सरपंच पदाची निवडणूक होणार होती.
एकसदस्य हजर नसल्यामुळे अडचणी येणार हे सर्वांनाच माहीत होते. दरम्यान बुधवारी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास नितीन गवळी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात हजर झाले, गावात जाण्यासाठी पोलिस सुरक्षेची गरज असल्याने सुरक्षा पुरवण्याची मागणी त्यांनी केल्याने पोलिसांच्या शासकिय वाहनातून (एम. एच. २७ एए ५९२) त्यांना वडगाव येथे पोलिस घेऊन आले. गावातील मंडळी नितीन गवळींचीच प्रतिक्षा करत होते. पोलिसांच्या वाहनात ते दिसताच प्रतिक्षा करणाऱ्यापैकी काही जणांनी थेट पोलिसांच्या वाहनावर धाव घेऊन गवळींना जबरीने आपल्या ताब्यात घेतले त्याठिकाणाहून लांब नेले. गावकरी पोलिसांच्या या झटापटीत पोलिसांच्या वाहनाच्या पाच फाटकांपैकी तीन फाटकांचे मोठे नुकसान झाले याचवेळी काहींनी या वाहनावर दगडफेक सुध्दा केली. परिस्थिती चिघळल्यामुळे अतिरीक्त पोलिस कुमक गावात दाखल झाली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी २५ ते ५० अज्ञात व्यक्तींविरुध्द शासकिय कामात अडथळा, दंगा या कलमान्वये गुन्हे दाखल केले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ... अन‌् गावाला आले पोलिस छावणीचे स्वरूप...