आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवेळी परीक्षा जाहीर; उमेदवारांची तारांबळ, अंशकालीन निदेशकांची पदभरती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सर्वशिक्षा अभियानांतर्गत अंशकालीन निदेशकांची पदभरती सुरू आहे. अर्जाची अंतिम तारीख पाच नोव्हेंबर रोजी होती. मात्र, अर्ज भरल्याबरोबर उमेदवारांना गुरुवारी (दि. 6) परीक्षा असल्याचे सांगण्यात आले. सर्वशिक्षा अभियान यंत्रणेने ऐनवेळी जाहीर केलेल्या परीक्षेमुळे उमेदवारांमध्ये तारांबळ उडाली.

अंशकालीन निदेशकांमध्ये कला शिक्षक, कार्य शिक्षक क्रीडा शिक्षकांची कंत्राटी पदभरती करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेबाबत २९ ऑक्टोबरला जाहिरात प्रकाशित झाली. जिल्ह्यातून एकूण १११ जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. या पदांसाठी २९ ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकृती सुरू होती. अंतिम िदवस असल्यामुळे बुधवारी गर्ल्स हायस्कूल परिसरातील सर्वशिक्षा अभियान कार्यालयात उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, बुधवारी ( दि. ५) अंतिम तिथीला अर्ज दाखल केल्याबरोबर उद्या (गुरुवारी) परीक्षा असल्याचे सांगण्यात आले. अनेक उमेदवार अमरावतीबाहेरचे म्हणजेच नागपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ आदी िठकाणचे असल्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर घरी परत केव्हा जायचे आणि तातडीचे उद्याच परतायचे कसे, यामध्ये ते अडकले आहेत.
आलेसाडेबाराशे अर्ज : १११पदांसाठी एक हजार २५० अर्ज आले आहेत. पाच नोव्हेंबरला रात्रीपर्यंत अर्ज छानणी सुरू होती. ऐनवेळी परीक्षेच्या नियोजनामुळे सर्वशिक्षा अभियान यंत्रणेचीही दमछाक होत आहे. मात्र, उच्च न्यायालयाने १५ नोव्हेंबरपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत जलद पद्धतीने सुरू आहे.
नियोजन नाही, उमेदवारांना फटका
नियोजनाचापुरता बट्ट्याबोळ झाला आहे. ऐनवेळी परीक्षा जाहीर झाल्यामुळे राहायचे कोठे, परीक्षा कधी द्यायची, ओळखपत्र केव्हा घ्यायचे, अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. नियोजनशून्यतेचा फटका आम्हांला बसत आहे. मनोजडहानकर, उमेदवार,नागपूर.
नोव्हेंबरलापरीक्षा
सर्वशिक्षाअभियानांतर्गत अंशकालीन निदेशकांची प्रक्रिया १५ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे तातडीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आली. परीक्षेची तारीख आम्ही बुधवारीच घोषित केली. परीक्षेसाठी शाळा खाली नसल्यामुळे तडकाफडकी निर्णय घ्यावा लागला. पंडितपंडागळे, उपशिक्षणाधिकारी.