आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturn Will Be Close To The Earth Issue, Divya Marathi

शनिवारी पृथ्वीच्या जवळ येणार शनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शनी ग्रह शनिवारी (दि. 10) पृथ्वीपासून सर्वांत कमी 133 कोटी 10 लक्ष किलोमीटर अंतरावर राहील. शनीची प्रतियुती असल्याने दुर्बिणीद्वारे नागरिकांना या ग्रहाचे दर्शन घेता येणार आहे, तर त्याच्या कडांचे अवलोकन टेलिस्कोपच्या साहाय्याने करता येईल.

शनी अत्यंत सुंदर आणि कुतूहल जागवणारा ग्रह आहे. त्याचा व्यास एक लक्ष 20 हजार किलोमीटर आहे. घनता सर्वांत कमी आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास 29.5 वर्षे लागतात. शनिवारी सूर्य मावळल्यानंतर तो पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. रात्रभर हा ग्रह आकाशात राहणार आहे. काळसर, पिंगट रंगाचा व चमकदार दिसेल. त्यामुळे सहज ओळखता येईल. शनीची कडा दोन लाख 70 हजार किलोमीटरपर्यंत पसरली आहे. ती साध्या डोळ्यांनी दिसणार नाही. त्यासाठी टेलिस्कोपचा उपयोग करावा लागेल. शनीची प्रतियुती ही दर 11 ते 12 महिन्यानंतर होते. यापूर्वी 28 एप्रिल 2013 रोजी ती झाली होती, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे