आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Savarkar Jayanti Special Story In Divya Marathi,

सावरकरांबरोबर काम करण्याची खापर्डेंना मिळाली होती संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बुधवारी (दि. 28) सावरकर जयंतीनिमित्त सुमारे सत्तर वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला आहे. ‘अमरावती शहराचा इतिहास’ या पुस्तकातील संदर्भानुसार, स्वा. सावरकर कुटुंबीयांसह एक ऑगस्ट 1943 रोजी शहरात आले होते. त्यावेळी स्थानकावर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता. खापर्डे वाड्यात त्यांच्या निवासाची व्यवस्था होती. डॉ. मुंजे, प्रा. देशपांडे, विश्वनाथराव केळकर यांच्याशी त्यांनी हिंदू महासभेची आगामी कार्यकारिणी व त्यागपत्र या विषयी चर्चा केली होती. जोग चौकात सकाळी सव्वानऊ वाजता डॉ. मुंजे यांच्या अध्यक्षतेत त्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. ‘हिंदू समाजाच्या पुनरुद्धाराचे कार्य तडीस नेण्यासाठी परमेश्वर तात्याराव यांच्या कार्यास यश देवो,’ अशी प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वागतगीतानंतर केली होती. त्यानंतर विदर्भ सावरकर सत्कार समितीचे अध्यक्ष बाबाराव खापर्डे यांनी प्रास्ताविक केले. सावरकर सन्मान निधीसाठी विदर्भातून 18 हजार 247 रुपये गोळा झाले होते. ते त्यांना अर्पण करण्यात आले. ‘आजच्या आणीबाणीच्या काळात सावरकर हेच आम्हाला नेते हवेत,’ असे डॉ. मुंजे अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते.

दोन ऑगस्टला संध्याकाळी परतले : सावरकरांनी दोन ऑगस्ट रोजी सकाळी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली होती. दुपारी तीन वाजता हिंदू विद्यार्थी संघाच्या वतीने ‘चालू युद्ध’ या विषयावर त्यांचे भाषण झाले. नंतर त्यांनी र्शी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला भेट दिली. घाटगे यांच्या बीए शिकणार्‍या विद्यार्थिनीला सावरकरांनी बक्षीस दिले. संध्याकाळी ते मुंबईकडे परतले.

स्वा. सावरकरांचे जोग चौकात भाषण : स्वा. सावरकर यांनी सत्काराला उत्तर देताना वरील वाक्य उद्धृत केले होते. ‘लोकमान्य टिळक नि दादाराव खापर्डे जसे खांद्याला खांदा लावून कार्य करीत, तसे आज मी आणि बाबाराव कार्य करीत आहोत. राजकारणात कोणताही धर्म, पंथ, जात न पाहणे हेच हिंदू महासभेचे धोरण आहे. तत्कालीन राजकारणाशी संबंधित विविध विषयांवर ते बोलले होते.
‘आज टिळक पुण्यतिथीला पुण्याप्रमाणे मला अमरावतीतही टिळकांचे दर्शन घडत आहे. कारण कै. दादासाहेब खापर्डे हे वर्‍हाडचे टिळकच आहेत,’ हे वाक्य होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त एक ऑगस्ट 1943 रोजी स्वा. सावरकर अमरावती शहरात आले होते.