आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scholarship News In Marathi, 20 Thousand Student Not Philip From

शिष्‍यवृत्ती उठली जीवावर,२० हजार विद्यार्थ्यांचे रखडले अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महाविद्यालयांचीनावे आणि त्याठिकाणी शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांच्या मॅपींगची (पडताळणी) प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या जीवावर उठली आहे. शिष्‍यवृत्तीचे अर्जच भरले गेले नसल्याने ती मिळेल केव्हा, याची त्यांना खात्री नाही. दुसरीकडे परीक्षा जवळ आल्यामुळे महाविद्यालयांनी मात्र शुल्क भरणा करण्यासाठी तगादा लावला आहे. परिणामी शिष्‍यवृत्तीधारक पुरता भरडला जात असून अर्ज लवकर भरता यावेत, अशी त्यांची मागणी आहे.

शिष्‍यवृत्तीच्या रकमेची चोरी होऊ नये म्हणून मॅट्रीकोत्तर शिष्‍यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी िनवडलेले महाविद्यालय त्यांच्या अभ्यासक्रमांचे समाज कल्याण महासंचालनालयातर्फे मॅपींग सुरु आहे. शैक्षणिक सत्र सुरु झाले त्यावेळपासूनच ही प्रक्रिया सुरु झाली. त्यासाठी अमरावती विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयांचे प्राचार्य संबंिधत लिपीक यांची कार्यशाळा आयोजित करुन प्रपत्र ‘अ’ भरुनही घेण्यात आले. या प्रपत्रांमध्ये महाविद्यालयांची नावे, विद्यापीठासोबत असलेले संलग्नीकरण, तेथे शिकवले जाणारे अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमांची मान्यता आदी बाबींचा समावेश होता. पुढे हे प्रपत्र सहायक आयुक्त (पूर्वीचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी) प्रादेशिक आयुक्त पातळीवर ‘ब’ आणि ‘क’ प्रपत्रांद्वारे पुणे येथे समाजकल्याण महासंचालनालयात पाठविण्यात आले. मात्र याठिकाणी ते अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वेबसाईटवर अजूनही काही बाबतीत महाविद्यालयांची तर काही बाबतीत अभ्यासक्रमांची नावे दिसून येत नाहीत. परिणामी गतवर्षी शिष्‍यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नूतनीकरणाचे अर्ज भरता आले नसून नव्यांची तर बातच दूर, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही प्रक्रिया शिष्‍यवृ़त्तीच्या आधारे आपले शिक्षण पूर्ण करू इच्छीणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या जीवावर उठली आहे.
२० हजार विद्यार्थ्यांचे रखडले अर्ज
विद्यार्थ्यांच्या शिष्‍यवृत्तीची रक्कम संस्थाचालकांनी घशात घातल्यामुळे दोन वर्षांपूर्वी ही प्रक्रिया ऑनलाइन झाली. शिवाय रक्कमही थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वळती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यातही पळवाटा शोधून काही संस्थाचालकांनी गोंधळ केला. यावर जालीम उपाय म्हणून राज्यभरातील महाविद्यालये त्या-त्या महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांचे ‘मॅपिंग’ करण्याचा निर्णय शासनाने यावर्षी घेतला. परंतु हे काम लांबल्याने अजूनही विद्यार्थ्यांना शिष्‍यवृत्तीचे अर्ज भरता आले नाही. दरम्यान, लवकरच मॅपिंग पूर्ण होऊन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगण्यात आले आहे.
कुणाला मिळते शिष्‍यवृत्ती
एकलाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ओबीसी, व्हीजे-एनटी एसबीसी किंवा दोन लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या एससी संवर्गातील उमेदवारांना भारत सरकारची शिष्‍यवृत्ती दिली जाते. फ्री िशपसाठी ही अट अनुक्रमे साडेचार लाख ‘नो बार’ अशी आहे. परंतु मॅपिंग पूर्ण झाल्यामुळे हे सर्व विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.
अधिकारी जाणार पुण्यात
शिष्‍यवृत्तीअर्ज भरण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने ‘मॅपिंग’लवकर होणे आवश्यक आहे. दरम्यान, या कामात किती प्रगती झाली, हे जाणून घेण्यासाठी अमरावतीचे अधिकारी येत्या दोन दिवसांत पुण्याला जात आहेत. अमरावती विद्यापीठांतर्गतच्या महाविद्यालयांचे मॅपिंग लवकर व्हावे, असा त्यांचा प्रयत्न राहील, असे प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.