आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Bus Transportation Is Not The Registration Of Students

रजिस्ट्रेशन नसलेल्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- आसनालगतचा पत्रा तुटला असतानाही प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असलेल्या चांदूररेल्वे आगाराच्या बसला आरटीओ विभागाने नुकतेच चालान केले. अलीकडच्या काळात आरटीओकडून झालेली या प्रकारातील ही पहिलीच कारवाई आहे.

चांदूररेल्वे आगाराची बस (एमएच 20 डी 8044) वाईबोथ येथून प्रवासी घेऊन निघाली होती. बसच्या आसन क्रमांक 13 ते 15 आणि 16 ते 18 ला लागून असलेला पत्रा तुटलेला होता. याच भागात खिडकीला काचादेखील नव्हत्या. आरटीओचे वाहतूक निरीक्षक एस. पी. पायघन आणि व्ही. एच. गुल्हाने यांनी या बसची केली आणि त्यानंतर चालान केले. या बसला आर्थिक दंड ठोठावण्यात येणार असल्याचे पायघन म्हणाले. एसटी बसची इतक्यात अपघात मालिका सुरू असतानाही महामंडळ अजूनही बसच्या प्रकृतीबाबत जागरूक झाले नसल्याचेच या घटनेवरून स्पष्ट होते. यापूर्वी आरटीओकडून एसटी बसमध्ये अतिरिक्त प्रवासी वाहून नेल्याबद्दल कारवाई केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, दुरवस्थेसाठी बसला चालान केल्याची ही पहिलीच वेळ आहे. याच काळात आरटीओकडून तीन बसमध्ये अतिरिक्त प्रवासी वाहतुकीची कारवाई केल्याची माहितीसुद्धा आरटीओ अधिकार्‍यांनी दिली आहे.अलीकडच्या काळात एसटी बसच्या अपघातात वाढ झाली आहे. एकेकाळी ‘सुरक्षित प्रवासा’चा हक्कच राखणार्‍या एसटी बसमध्ये चढल्यानंतर सुरक्षेची हमी प्रवाशांना राहिलेली नाही. अनेक एसटी बसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. तरीही प्रवासी वाहतुकीसाठी या बस वापरल्या जात आहेत.

मुख्याध्यापकासह तिघांना नोटीस :

स्कूल बसमालकाने नोंदणी का केली नाही, रजिस्ट्रेशन केल्याशिवाय बस रस्त्यावर कशी धावत आहे, मुख्याध्यापकांना ही बाब लक्षात का आली नाही, असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्यामुळेच प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र वाढोकर यांनी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना, बसची विक्री करणार्‍या विक्रेत्याला आणि बसमालकाला नोटीस बजावल्या आहेत.

गंभीर प्रकार, नोटीस बजावल्या

रजिस्ट्रेशन न करताच बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती. त्यामुळे बस तत्काळ जप्त करण्यात आली. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांसह तिघांना नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्याकडून लवकरच उत्तर अपेक्षित आहे. उत्तर न आल्यास या प्रकरणात न्यायालयीन कारवाई करणार आहे. एसटी बसची स्थिती योग्य नसल्यामुळे वाहतूक निरीक्षकांनी कारवाई केली आहे. राजेंद्र वाढोकर, प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी.