आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सायन्सकोर’चे क्रीडा संकुलात व्हावे रूपांतर'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आमचाजन्म झाला तेव्हापासून सायन्सकोर, दसरा मैदान, नेहरू मैदानाला आम्ही खेळाचे मैदान म्हणून ओळखतो. तेथे धार्मिक कार्यक्रम, सभा, संमेलनं, प्रदर्शनी, सर्कस असे आयोजन होत असले तरी यासाठी काही ते राखीव नाही. त्यामुळे या मैदानांचे जतन हे क्रीडा मैदान म्हणूनच व्हायला हवे. सायन्सकोर मैदानावर नेहमीच विविध आयोजनं होत असतात. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होते. कधी तर त्यांना दोन-तीन महिने खेळता येत नाही. त्यामुळे या मैदानाचे क्रीडा संकुलात रुपांतर व्हावे, अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली आहे.
राजकीय नेते निवडणुकीचा काळ आला की, मतं मागण्यासाठी या मैदानांचा वापर करतात. नंतर मात्र तिकडे कोणीही येत नाही. या मैदानाच्या रक्षणासाठी त्यांनीही पुढाकार घ्यायला हवा. केवळ स्वार्थसिद्धीसाठी मैदान वापरायचे अन् काम झाले की, त्याकडे पाठ फिरवायची ही जुनीच पद्धत आता बदलायला हवी. आता तर जो या मैदानाचा कायापालट करेल, त्याचे सौंदर्यीकरण करेल त्यालाच पाठबळ देण्याची वेळ आली आहे. अन्यथा शहरात एकही मैदान शिल्लक राहणार नाही. म्हणून शहरातील जनतेने उर्वरित मैदानांच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिल्या आहेत.

शहरातील१० हजार विद्यार्थी येणार एकत्र

येत्याक्रीडा दिनी २९ आॅगस्ट रोजी शहरातील विविध शाळांचे १० हजार विद्यार्थी सायन्सकोर मैदानाच्या रक्षणासाठी एकत्र येणार आहे. मैदान स्वच्छ करण्याच्या अभियानाला सकाळी सुरुवात होईल. त्यानंतर येथे विविध खेळांचे प्रदर्शनी सामने आयोजित केले जातील. हे मैदान , क्रिकेट, हाॅकी, कबड्डी खो-खोसारख्या मैदानी खेळांसाठी राखीव आहे. ते नेहमीसाठी तसेच कायम राहावे, अशी भावना असल्यामुळे आम्ही या मैदानावर एकत्र येऊ अशी माहिती महानगर शारीरिक शिक्षक संघटना जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेने दिला आहे.
आता सर्वांनी पुढाकार घ्यावा
तर शहराचे आराेग्य धोक्यात
मैदानांवर खेळाडूंचाच हक्क
मैदानं ही आपुलकीची जागा
मैदानं हेच शहराचे भविष्य
सायन्सकोर खेळाचेच मैदान
सायन्सकोर मैदानाचा विकास होईल. येथे आम्हाला मनसोक्त खेळता येईल म्हणून बरीच वाट बघितली. मात्र खेळाकडे अजूनही कोणी फारसे लक्ष देत नाही. सर्वांनी आता पुढे यायला हवे. अक्षयमंगुलकर, फुटबाॅलप्रेमी.

मैदान हे केवळ खेळासाठी असावे. ज्यांच्या अखत्यारीत ते आहे, त्यांनी खेळाडूंचा हक्क हिरावून त्याचे स्वार्थासाठी बाजारीकरण करू नये. यामुळे शहराचे आरोग्य बिघडू शकते. आदित्यपाटील, अभियांत्रिकीचा विद्यार्थी.

सायन्सकोर असो किंवा दसरा मैदान. या मैदानांवर खेळाडूंचाच पहिला हक्क आहे. या मैदानांवरच खेळून आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल आत्मियता वाटते. त्यांचे बाजारीकरण व्हायला नको. हरिभाऊबरवट, ज्येष्ठ नागरिक .

खेळाडूंसाठी मैदानं ही आपुलकीची जागा आहे. कारकीर्द घडवण्यासाठी तेथे अनेक खेळाडूंचा घाम वाहतो. देशाला खेळाडू त्यांच्यापासून लौकिक िमळत असतो, म्हणून मैदानांचे जतन व्हावे. श्वेताकांडलकर, खेळाडू .

मैदानं हेच शहराचे भविष्य आहे. येथेच भविष्यातील सुदृढ नागरिक अन् खेळाडू घडत असतात. हे मैदानच सांस्कृतिक केंद्र ठरतात. कारण येथे सर्वच जाती, धर्माची मुले एकत्रितपणे खेळतात. पवनअंबुलकर, विद्यार्थी.

सायन्सकोर मैदान हे खेळांचे मैदान हेच मला माहित आहे. येथे इतर आयोजनं व्हायलाच नको. ते काही सभांसाठी राखीव नाही तर खेळांसाठी आहे. त्याशिवाय शहरात क्रीडांगणच नाही. रवीपाचंगे, व्यवसायी .
सहकारातून समाधान
बातम्या आणखी आहेत...