आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळाबाह्य शोध मोहिमेबाबत आज बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शाळाबाह्यबालकांची शोध मोहिमेचे नियोजन करण्याबाबत तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक मंगळवार ३० जून रोजी होणार आहे. जिल्ह्यातील लाख ४७ हजार ४५१ कुटुंबांचे सर्वेक्षण या मोहिमेदरम्यान केले जाणार आहे. शिवाय शाळाबाह्य बालकांची अचूक माहिती समोर यावी म्हणून जुलै ‘विद्यार्थी उपस्थिती दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

शाळाबाह्य बालक शोध मोहिमेत शिक्षण, महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय विशेष सहाय्य, महिला बालकल्याण, अल्पसंख्यांक विभाग आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहे. सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा तसेच कार्यक्रमाचे नियोजन करता यावे म्हणून ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, शासकीय कामगार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गट शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहे.

शाळाबाह्य बालकांची पाहणी सकाळी ते सायंकाळी या वेळेत केली जाणार असून जुलैला शाळा सकाळी ११ ते दुपारी या वेळेत सुरू ठेवली जाणार आहे. सर्वेक्षणाचा दिवशी शाळेची उपस्थिती १०० टक्के ठेवण्याची सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत (विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक नाही, बाहेर गावी गेलेला असणे) विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असतील तर त्याची आगाऊ सूचना मुख्याध्यापकांनी सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या पथकास देणे गरजेचे आहे.
सर्वेक्षण करताना मतदार यादीवरून कुटुंबाची संख्या विचारात घेतली जाणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान प्रचलित मतदान केंद्रनिहाय सर्वेक्षक दिला जाणार आहे. यासाठी बीएलओ तसेच जणगणनेसाठी उपलब्ध प्रगणकांची मदत घेतली जाणार आहे.

एका झोनसाठी १०० पेक्षा कमी कुटुंब संख्या घेण्यात यावी, गुंतागुंतीच्या क्षेत्रामध्ये १०० पेक्षा कमी कुटुंबाच्या सर्वेक्षणाकरिता एक प्रगणक दिला जाणार आहे. शंभर घरांच्या सर्व्हेक्षणासाठी एक सर्वेक्षक अधिकारी तर आवश्यकतेनूसार २० सर्वेक्षण अधिकाऱ्यावर एक झोनल अधिकारी २० झोनल अधिकाऱ्यासाठी एक नियंत्रक अधिकारी नियुक्त केल्या जाणार आहे. सर्वेक्षण झालेल्या बालकाच्या बोटाला पल्स पोलिओ मोहिमेप्रमाणे स्याही देखील लावली जाणार आहे.

मोहिमेचे नियोजन
बातम्या आणखी आहेत...