आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security For Narendra Modi Issue At Amravati, Divya Marathi

‘नमों’च्या सुरक्षेसाठी 66 अधिकारी, 325 पोलिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे रविवारी (दि. 30) शहरात आगमन होत आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं (आठवले) महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ सायन्सकोर मैदानावर त्यांची सकाळी नऊ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा पूर्णत: सज्ज झाली असून, हेलिपॅड व सभास्थळी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी तब्बल 66 पोलिस अधिकारी आणि 325 कर्मचारी कर्तव्यावर राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी पोलिस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी सायन्सकोर मैदानाची पाहणी केली.
2009 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी शहरात आले होते. यानंतर पहिल्यांदाच ते रविवारी शहरात येत आहेत. त्यांची सुरक्षा लक्षात घेता, एनएसजी पथकासह गुजरात पोलिस शहरात दाखल झाले आहेत. याच वेळी स्थानिक पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा भार राहणार आहे. त्यामुळेच विद्यापीठातील हेलिपॅडपासून तर रस्त्यावरसुद्धा पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हेलिपॅडवर दोन सहायक पोलिस निरीक्षकांसह दोन उपनिरीक्षक, 25 पोलिस कर्मचारी आणि दोन महिला कर्मचारी तैनात राहतील. सायन्सकोर मैदानावरील सभास्थळी उपायुक्त बी. के. गावराने, सहायक पोलिस आयुक्त शशिकांत भंडलकर यांच्यासह नऊ पोलिस निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, 12 उपनिरीक्षक आणि 180 पोलिस कर्मचारी तसेच 30 महिला कर्मचारी बंदोबस्त सांभाळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, भाजप- शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह पाोलिस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी शनिवारी सायन्सकोर मैदानाची पाहणी केली. या वेळी आमदार अभिजित अडसूळ सोबत होते. एकंदर रविवार हा पोलिसांसाठी ‘हाय व्होल्टेज डे’ राहणार आहे. तत्पूर्वी, शनिवारी गुजरात राज्यातील विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी व पोलिस अधिकारी शहरात दाखल झालेत.