आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतयाकडून आठ बँकांच्या बोगस नोटीस केल्या जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जनता सहकारी बँकेच्या गाडगेनगर शाखेमध्ये जाऊन बाजार परवानाची बोगस नोटीस बजावणा-या तोतया विराेधात बाजार परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी फसवेगिरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी आठ बँकांसाठी तयार केलेल्या बोगस नोटीस जप्त केल्या.
सुनील रामकृष्ण राजगुरे (५० रा. रविनगर) असे त्या तोतयाचे नाव आहे. राठीनगरातील जनता सहकारी बॅकेच्या गाडगेनगर शाखेत जाऊन त्याने बाजार परवाना काढण्याबाबत २४ जूनला नोटीस दिली होती. नाेटीस संदर्भात बॅकेला संशय आ ला. ही माहिती त्यांनी पालिकेला दिली. या वरून शुक्रवारी दुपारी राजगुरेला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी पालिकेचे उपायुक्त औगड यांनी बाजार परवाना विभागाला पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिले. या वरून बाजार परवाना विभागाचे सहायक अधीक्षक रामदास वाकपांझर यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून शुक्रवारी रात्री राजगुरेविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला. पेालिसांना त्याच्याकडे आठ बोगस नोटीस आ ढळल्या. यामध्ये एचडीएफसी बँक, निशांत सहकारी पतसंस्था, अमरावती मर्चंट को ऑपरेटीव्ह बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्राच्या तपोवन शाखा,देना बँक आणि धरमपेठ महिला सहकारी बँक यांच्या नावाच्या बोगस नोटीस पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच अन्य दस्ताऐवज सुध्दा मिळून आले.
झेरॉक्सवरून तयार केल्या बोगस नोटीस
राजगुरेकडून पोलिसांनी जप्त केलेल्या नोटीसची पाहणी केली. या नोटीस एका झेरॉक्सवरून तयार केलेल्या आहे. कारण काही नोटीसवर व्हाईटनरचा वापर करून त्याच्या झेरॉक्स काढल्या. त्यानंतर त्या नोटीसवर दोन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी बँकेचे नाव लिहिले आहे. याच पध्दतीने त्याने बोगस नोटीस तयार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे गाडगेनगरचे ठाणेदार कैलाश पुंडकर यांनी सांगितले.असे असले तरी महापालिकेच्या शासकीय दस्ताऐवज झेरॉक्स का असेना पण राजकुरेकडे आले कसे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
नोटीस देऊन सोडले
- याप्रकरणी राजगुरेविरुध्द फसवेगिरीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी आम्ही त्याला नोटीस देऊन सोडले आहे. तपासात ज्यावेळी त्याची गरज असेल त्यावेळी बोलवण्यात येईल.
कैलाश पुंडकर, ठाणेदार, गाडगेनगर
बातम्या आणखी आहेत...