आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Select Justice Major Government Women Smita Wagh

महिलांनी निवडावे न्याय देणारे सरकार - स्मिता वाघ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महागाई आणि स्त्रियांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. या महागाईत जगणे कठीण झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महिलांच्या संरक्षणासाठी जबाबदार भूमिकेत दिसत नाही. त्यामुळे महिलांनी आपल्याला न्याय देणारे सरकार निवडून स्त्रीशक्ती दाखवून द्यावी, असे मत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष स्मिता वाघ यांनी व्यक्त केले.
टाउन हॉलमध्ये बुधवारी ‘वाण विचारांचे’ उखाणे आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धा पार पडली. त्याचे उद्घाटन स्मिता वाघ यांनी केले. अमरावती शहर जिल्हा भाजप महिला आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजप शहराध्यक्ष तुषार भारतीय होते.
हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना भेटवस्तू व तीळगूळ देण्यात आले. स्मिता वाघ यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. मकर संक्रमणाच्या काळात महिलांनी परिवर्तनाची शपथ घ्यावी, असे आवाहन किरण महल्ले यांनी केले. सुरेखा लुंगारे यांनी स्मिता वाघ यांचा परिचय दिला. आघाडीच्या शहराध्यक्ष राधा कुरील यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाला महापालिकेतील गटनेते संजय अग्रवाल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीना पाठक, प्रदेश सचिव निवेदिता चौधरी, प्रदेश महिला आघाडी सचिव वैशाली दाबेराव, महिला आघाडीच्या सरचिटणीस गंगा खारकर यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती.