आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिकाचे बँकेत लुटले साडेतीन लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बँकेमध्येबतावणी करून महेंद्र कॉलनीमधील एका ज्येष्ठ नागरिकाकडून चोरट्याने साडेतीन लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. मधुकर बोबडे (रा. महेंद्र कॉलनी)असे फसगत झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

याप्रकरणी, बुधवारी उशिरा रात्री गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बोबडे, हे भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) बियाणी चौकातील शाखेमध्ये एटीएम
काढण्यासाठी गेले होते. अर्ज भरत असताना एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला त्याने तुमच्या खात्यातील रक्कम काढून काही वेळाने ती परत टाकल्यास बँकेकडून ३० हजार
रूपये मिळण्याची योजना बँकेने सुरू केली आहे असे त्यांना सांगितले. बोबडे यांनी त्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आपल्या खात्यातून साडेतीन लाख रूपये
काढले. भामट्याने ३० हजार रूपयांचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरावा लागेल असे सांगून मी तुमचे साडेतीन लाख बँकेत भरतो, तुम्ही फक्त एक झेरॉक्स घेऊन या, असे
सांगितले.

सीसीटीव्ही कॅमे-याची होणार मोठी मदत
बॅकेच्याआतमध्ये हा लुबाडणूकीचा प्रकार झालेला आहे. बॅकेत लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा प्रकार कैद असेलच, त्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिस
आरोपीपर्यंत पोहचू शकतील.